आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे कोविड सेंटर राज्यातील पहिलेच खासगी सेंटर-राजेश टोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 14:18 IST2020-08-17T14:17:58+5:302020-08-17T14:18:44+5:30
अहमदनगर - आमदार निलेश लंके यांच्या प्रतिष्ठाने उ•ाा केलेल्या कोविड सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा आहेत. या सेंटरमध्ये एक हजार बेड उपलब्ध केले आहेत. ज्या आवश्यक बाबी आहेत, त्या सर्व कोविड सेंटरमध्ये दिल्या आहेत. लक्षणे नसलेल्या पण पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांसाठी टीव्ही, मनोरंजनाच्या सोयी-सुविधा कोविड सेंटरमध्ये केल्या आहेत. महिलांसाठीही वेगळे दालन आहे. लोकप्रतिनिधी जबाबदारीने काम करीत आहेत. आमदार निलेश लंके व त्यांचे ट्रस्ट अत्यंत परिश्रमपूर्वक चांगले काम करीत आहेत, असे कौतुक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.

आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे कोविड सेंटर राज्यातील पहिलेच खासगी सेंटर-राजेश टोपे
अहमदनगर - आमदार निलेश लंके यांच्या प्रतिष्ठाने उ•ाा केलेल्या कोविड सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा आहेत. या सेंटरमध्ये एक हजार बेड उपलब्ध केले आहेत. ज्या आवश्यक बाबी आहेत, त्या सर्व कोविड सेंटरमध्ये दिल्या आहेत. लक्षणे नसलेल्या पण पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांसाठी टीव्ही, मनोरंजनाच्या सोयी-सुविधा कोविड सेंटरमध्ये केल्या आहेत. महिलांसाठीही वेगळे दालन आहे. लोकप्रतिनिधी जबाबदारीने काम करीत आहेत. आमदार निलेश लंके व त्यांचे ट्रस्ट अत्यंत परिश्रमपूर्वक चांगले काम करीत आहेत, असे कौतुक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.
आमदार निलेश लंके प्रतिष्ठानतर्फे पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथे उ•ाारण्यात आलेल्या एक हजार बेड क्षमतेच्या श्री. शरद पवार आरोग्य मंदिर तथा कोविड सेंटरचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी आमदार लंके यांनी टोपे यांना कोविड सेंटरची माहिती दिली.
यावेळी टोपे म्हणाले, कोरोनाचा सर्वच सामना करीत आहेत. मात्र सर्वांनीच आता सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळलेच पाहिजेत. त्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. सध्या लॉकडाऊनची गरज नाही. सरकार कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सक्षमपणे काम करीत आहे. अधिकाºयांना मोठे अधिकार दिलेले आहेत.
पारनेरचे आमदार लंके हे उपक्रमशील आमदार म्हणून परिचित आहेत. स्वखर्चातून उ•ाारण्यात आलेले हे पहिलेच कोविड सेंटर आहे. कोरोनाचा प्रसार जेवढा वाढला आहे, तेवढा मदतीचा ओघही वाढलेला आहे. सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये अद्ययावतहॉस्पिटल उ•ाारणीसाठी प्रयत्न करू.
---
पार्थ समंजस-टोपे
पार्थ पवार हे समंजस आहेत. काही छोटे-मोठे वाद असतील तर ते सोडविण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे समर्थ आहेत. पवार यांच्या घरातील सर्व वेगवेगळ््या क्षेत्रात काम करीत आहेत. पार्थ हा माझा चांगला मित्र आहे. तो समंजस आहे, असे टोपे म्हणाले.