तर नगर शहरातील आमदार काँग्रेसचाच : बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 13:01 IST2021-03-27T12:59:33+5:302021-03-27T13:01:59+5:30
त्यांना एकत्र केले तर नगर शहरात आमदारही काँग्रेसचाच होऊ शकतो.

तर नगर शहरातील आमदार काँग्रेसचाच : बाळासाहेब थोरात
अहमदनगर : नगर शहरात काँग्रेस पक्षाला मानणारे खूप कार्यकर्ते आहेत. त्यांना एकत्र केले तर नगर शहरात आमदारही काँग्रेसचाच होऊ शकतो. नगर शहराचा निवडणुकीनंतरचा महापौर काँग्रेसचाच होईल, यासाठी आतापासूनच तयारी करा, असे आदेश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिले. नगर शहरातील बैठकित थोरात बोलत होते.
थोरात म्हणाले, कोरोनाचे नियम सर्वांनी पालन करा, नाहीतर लॉकडाऊन करावाच लागेल. राज्यातील सरकार पाच वर्षे टिकेल. भाजप समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करीत आहे. गरीब बांगलादेश आज पुढारला आहे. भारतात धर्माधर्मात भांडणे लावून देश रसातळाला नेत आहेत. नोटबंदी, जीएसटी, पेट्रोल दरवाढीने अर्थव्यवस्थेची वाट लागली. एक रुपया पेट्रोल वाढले तरी आंदोलन करणारे भाजपवाले आज गप्प आहेत. कृषीच्या कायद्याने महागाई वाढणार आहे.