दातीर हत्याकांडाचा तपास मिटकेंकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:19 IST2021-04-17T04:19:57+5:302021-04-17T04:19:57+5:30
पत्रकार दातीर हे ६ एप्रिल रोजी दुपारी घरी परत येत असताना राहुरी शहराजवळील मल्हारवाडी रोडने आलेल्या एका पांढऱ्या ...

दातीर हत्याकांडाचा तपास मिटकेंकडे
पत्रकार दातीर हे ६ एप्रिल रोजी दुपारी घरी परत येत असताना राहुरी शहराजवळील मल्हारवाडी रोडने आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी त्यांचे अपहरण करून त्यांचा खून केला होता. सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ हे करत होते. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी (वय २५) व तौफिक मुक्तार शेख (वय २१, रा. दोघे राहुरी) यांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरार आहेत. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हा तपास उपअधीक्षक मिटके यांच्याकडे वर्ग केला आहे.
...............
दोघा माजी मंत्र्यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
पत्रकार रोहिदास दातीर हत्याकांडाबाबत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व राम शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देऊन या गुन्ह्याचा सखोल तपास करत सर्व दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने कर्डिले यांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावरही आरोप केले आहेत. तपासात काही त्रुटी राहू नयेत त्यामुळे हा गुन्हा पोलीस अधीक्षक यांनी मिटके यांच्याकडे वर्ग केला आहे.
.............