अकारी पडीत शेतकऱ्यांची महसूलकडून दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:40+5:302021-06-21T04:15:40+5:30

शेतीमहामंडळाच्या हरेगाव मळा पंचक्रोशीतील अकारी पडीत शेतकऱ्यांची कोविड नियमांचे पालन करत उंदीरगाव येथे बैठक आयोजित करण्यात आली ...

Misleading farmers from revenue | अकारी पडीत शेतकऱ्यांची महसूलकडून दिशाभूल

अकारी पडीत शेतकऱ्यांची महसूलकडून दिशाभूल

शेतीमहामंडळाच्या हरेगाव मळा पंचक्रोशीतील अकारी पडीत शेतकऱ्यांची कोविड नियमांचे पालन करत उंदीरगाव येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात काळे बोलत होते.

काळे म्हणाले, महसूल खात्याकडून लवकरात लवकर सुटावा यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास सांगतात. आम्ही शेतकऱ्याबरोबर आहोत, असे थोरात सतत बोलतात. मात्र महसूल खात्याच्या सचिवाकडून अकारी पडीत शेतकऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात शपथपत्र कसेकाय दाखल केले जाते?

खंडकऱ्यांचे प्रश्नापेक्षाही हा अकारी पडीत शेतकऱ्यांचा प्रश्न सोपा असताना सरकारकडून सद्या परिस्थितीत न्यायालयात दिशाभूल केली जात आहे. यापूर्वी तत्कालीन महसूल सचिव प्रकाश बर्वे यांनी अकारी पडीत शेतकऱ्यांच्या बाजूने शपथपत्र दाखल केले होते. आता सरकार बदलले आहे. युती सरकारच्या काळात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.

महाविकास आघाडी सरकारमध्ये योगायोगाने जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खात्याचा कार्यभार आला आहे. त्यामुळे अकारी पडीत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. कारण या प्रश्नांची मंत्री थोरांत यांना संपूर्ण माहिती आहे. आघाडी सरकारच्या कार्यकाळात हा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा होती. मात्र महसूल विभागाच्या राज्य शेती महामंडळाकडून राज्यातील इतर मळ्यांप्रमाणे हरेगाव, टिळकनगर येथील शेकडो एकर जमीन प्लॉटचे राजकीय बड्या राजकीय नेत्यांना कराराने वाटप करण्यात आले, असा आरोप काळे यांनी केला.

जो कोणी अकारी पडीत शेतकऱ्यांना जमीन वाटप करेल, आम्ही त्याला श्रेय देऊ, तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते या लढाईत सहभागी झाले आहेत. मात्र प्रश्न सुटत नसेल तर रस्त्यावर उतरून लढाई लढावी लागेल, असा इशारा काळे यांनी दिला.

यावेळी शेतकरी संघटनेचे नेते अनिल औताडे, गिरीधर आसने, अण्णासाहेब थोरात, संपतराव मुठे, भीमभाऊ बांद्रे, वसंत मुठे, आदिनाथ झुरळे, बाळासाहेब बकाल, लहानू शेजुळ, शरद आसने, सोपान नाईक, बबन नाईक, रावसाहेब कासार, अजिंक्य गायके आदी उपस्थित होते.

--

Web Title: Misleading farmers from revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.