माध्यमिक सोसायटीच्या अध्यक्षपदी मिसाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:24 IST2021-08-12T04:24:57+5:302021-08-12T04:24:57+5:30
केडगाव : माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या अध्यक्षपदी सुरेश मिसाळ तर उपाध्यक्षपदी अण्णासाहेब ढगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकार खात्याचे ...

माध्यमिक सोसायटीच्या अध्यक्षपदी मिसाळ
केडगाव : माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या अध्यक्षपदी सुरेश मिसाळ तर उपाध्यक्षपदी अण्णासाहेब ढगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सहकार खात्याचे अधिकारी के. के. आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी मिसाळ यांच्या नावाची सूचना सत्यवान थोरे यांनी मांडली व त्यास अशोक ठुबे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी ढगे यांच्या नावाची सूचना संजय कोळसे यांनी मांडली व त्यास धोंडिबा राक्षे यांनी अनुमोदन दिले. निवड प्रक्रियेसाठी संस्थेचे सचिव स्वप्निल इथापे यांनी साहाय्य केले.
नूतन अध्यक्ष मिसाळ म्हणाले, संस्थेचा कारभार अधिकाधिक पारदर्शी व सभासदाभिमुख करण्याचा प्रयत्न राहील. कर्जाचा व्याजदर आणखी कमी करून ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी मंडळाच्या ध्येयधोरणानुसार पथदर्शी कारभार कायम राहील.
उपाध्यक्ष ढगे म्हणाले, पुरोगामी मंडळाचे दूरदृष्टीच्या कारभाराची प्रचिती संस्थेच्या उत्तम कारभारातून येत आहे. संस्थेच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वाढतच आहे. सभासदांचा विश्वास सार्थ ठरवणारे काम संस्थेने नेहमीच केले असून तीच परंपरा यापुढेही कायम राखण्याचा प्रयत्न असेल.
निवडीप्रसंगी संचालक ज्ञानेश्वर काळे, ज्येष्ठ संचालक प्रा. भाऊसाहेब कचरे, चांगदेव खेमनर, काकासाहेब घुले, सूर्यकांत डावखर, धनंजय म्हस्के, बाबासाहेब बोडखे, दिलीप काटे, अशोक ठुबे, संजय कोळसे, सत्यवान थोरे, अनिल गायकर, कैलास राहाणे, धोंडीबा राक्षे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, आशा कराळे, मनीषा म्हस्के, पुंडलिक बोठे, दिलावर फकीर, संस्थेचे सचिव स्वप्निल इथापे आदी उपस्थित होते.
.................
फोटो १० माध्यमिक सोसायटी