शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मिरजगाव, जामखेड दरोड्यातील गुन्हेगार जेरबंद; चोरीतील दोन लाख हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 15:57 IST

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे दरोडा घालणारे सराईत गुन्हेगार व जामखेडमध्ये घरफोडी करून पाच लाखांचा ऐवज पळवणा-या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी जेरबंद केले आहे. जामखेडच्या गुन्हेगारांकडून २ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. 

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे दरोडा घालणारे सराईत गुन्हेगार व जामखेडमध्ये घरफोडी करून पाच लाखांचा ऐवज पळवणा-या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी जेरबंद केले आहे. जामखेडच्या गुन्हेगारांकडून २ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. 

मिरजगाव येथील मधुकर विठ्ठल कोरडे यांच्या घरी २३ जून रोजी दरोडा पडला होता. कोरडे हे त्यांच्या पत्नीसह घरामध्ये झोपलेले असताना अनोळखी गुन्हेगारांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. कोरडे पती-पत्नीला तलवारीचा धाक दाखवून व जिवे मारण्याची धमकी देऊन घरातील कपाटामध्ये असलेले ३ लाख ५०० रूपयांचे दागिने चोरुन नेले.

याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात कोरडे यांनी फिर्याद दिली होती. कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक  दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन वेगवेगळी पथके तयार केली. 

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कर्जत तालुक्यातील बेलगाव येथे सापळा लावण्यात आला. पोलीस आल्याचे पाहून आरोपी पळाले, मात्र पोलिसांनी पाठलाग करून आरोपी युवराज उर्फ धोडीराम ईश्वर भोसले (वय २३),  सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले (वय २५ वर्ष, दोघेही रा . बेलगाव, ता. कर्जत), तसेच देवीदास उर्फ देवड्या अभिमान काळे (वय २८, रा . हरिनारायण आष्टा , ता . आष्टी) यांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. साथीदार आरोपींचा शोध घेण्यात आला, परंतु ते मिळून आले नाहीत.

या तीनही आरोपींवर आष्टी, कर्जत, सांगोला, अंभोरा, पाथर्डी आदी पोलीस ठाण्यात १० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडCrime Newsगुन्हेगारी