मिरजगावात नगर-सोलापूर महामार्ग रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 17:05 IST2018-08-09T17:05:08+5:302018-08-09T17:05:21+5:30
नगर - सोलापूर महामार्गावर मिरजगाव येथील क्रांती चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

मिरजगावात नगर-सोलापूर महामार्ग रोखला
मिरजगाव : नगर - सोलापूर महामार्गावर मिरजगाव येथील क्रांती चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
अत्याआवश्यक सेवा वगळता शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला,निमगाव गागंर्डा,माहिजळगाव,कोकणगाव,ज्योतिबावाडी याठिकाणी ही आंदोलन करून बंद पाळण्यात आला. आरक्षणाच्या मागणी ही रास्त असल्याने सरकाने समाजाच्या भावनाशी खेळू नये,घटनेत दुरूती करा अथवा घटना बदला पण आरक्षण द्या अशी मागणी सर्व कार्यकत्यार्नी केली, यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते,नगर-सोलापूर महामार्गावर सकाळ पासून वहातूक तुरळकच होती, मात्र अनेक प्रवाशी रस्त्यावर वहानाची वाट पहात होते,एकही एसटी बस यामार्गावर धावली नाही.