अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By Admin | Updated: June 26, 2014 00:46 IST2014-06-26T00:07:16+5:302014-06-26T00:46:27+5:30

अहमदनगर : एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून, पळवून नेऊन वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करणाऱ्या हेमंत पांडुरंग शेलार

Minor girl tortured | अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर : एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून, पळवून नेऊन वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करणाऱ्या हेमंत पांडुरंग शेलार (वय ३२, रा. गोगादेव मंदिर, अहमदनगर) याला जिल्हा न्यायाधीश एस. के. केवले यांनी दोषी धरून सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील अत्याचारित मुलगी फितूर घोषित झाली होती. परंतु उलट तपासणीत तिने संपूर्ण घटना मान्य केली. पोलिसांनी सादर केलेला डी.एन.ए. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोपीवर दोषारोप निश्चित झाल्याचे अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. सुरेश लगड यांनी सांगितले.
अहमदनगर येथील हेमंत पांडुरंग शेलार याने २३ मार्च २०१२ रोजी कारने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होेते. त्याने मुलीला पुणे, बेंगलोर आदी ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या काळात अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. तिला दोघांपासून मुलगा झाला. आरोपी व मुलगी यांना तोफखाना पोलिसांनी पुण्यात अटक केली. त्यांना नगरला आणून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
अल्पवयीन मुलीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. या प्रकरणाचा खटला सुरू झाला तेव्हा अल्पवयीन मुलगी फितूर झाली होती. मात्र उलट तपासणीमध्ये तिने संपूर्ण घटना मान्य केली. या प्रकरणात पोलिसांनी डी.एन.ए. चाचणी घेतली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. सुरेश लगड यांनी १५ साक्षीदार तपासले. शासनातर्फे अ‍ॅड. लगड यांनी तर, अल्पवयीन अत्याचारित मुलीतर्फे न्यायाधारच्या अध्यक्षा अ‍ॅड. निर्मला चौधरी यांनी काम पाहिले. त्यांना स्मिता मुरुमकर, अ‍ॅड. अमोल टेकाडे यांनी सहाय्य केले.
आरोपी हेमंत याला सात वर्ष सक्तमजुरी व २० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. दंडाच्या ४० हजार रकमेपैकी ३५ हजार रुपये अत्याचारित मुलीस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Minor girl tortured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.