अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By Admin | Updated: June 1, 2014 00:24 IST2014-05-31T23:47:55+5:302014-06-01T00:24:24+5:30
आश्वी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना प्रतापपूर (ता. संगमनेर) येथे उघडकीस आली. विनायक उर्फ पिंट्या सुखदेव सांगळे (वय ३५) असे अत्याचार करणार्या युवकाचे नाव
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
आश्वी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना प्रतापपूर (ता. संगमनेर) येथे उघडकीस आली. विनायक उर्फ पिंट्या सुखदेव सांगळे (वय ३५) असे अत्याचार करणार्या युवकाचे नाव असून अत्याचार पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. अत्याचार पिडीत मुलगी व तिची आई या अशोक आंधळे यांच्या शेतात गवत काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी आरोपी सांगळे घासाचे ओझे उचलून सायकलवर ठेवण्यासाठी मदतीला येण्याचे निमित्त करुन तिला बोलावून घेतले. किरकोळ छेडछाडीचा प्रकार समजून आरोपीच्या वडिलांनी सांगितले असता त्यांनी विनायक मतिमंद असून झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. परंतु मुलीने अत्याचार केल्याचे आईला सांगितले.