मंत्र्यांनी बदल्यातील पैशातून एखादे कोविड सेंटर उभारावे; खासदार विखे यांचा मंत्री थोरात यांना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 13:09 IST2021-04-24T13:08:34+5:302021-04-24T13:09:13+5:30
श्रीगोंदा : मंत्री कोरोनाच्या आढावा बैठका घेऊन ऑक्सिजन, रेमडीसिवरचा आढावा घेतात पण कार्यवाही शुन्य आहे. त्यापेक्षा बदल्यात कमविलेल्या पैशातून कोविड सेंटर सुरु करावेत. शासनाच्या पैशातून सुरु असलेल्या कोविड सेंटरवर पाट्या लावू नयेत, असा टोला खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी महसुल मंत्रीबाळासाहेब थोरात यांचे नाव थोरातांना लगावला आहे.

मंत्र्यांनी बदल्यातील पैशातून एखादे कोविड सेंटर उभारावे; खासदार विखे यांचा मंत्री थोरात यांना टोला
श्रीगोंदा : मंत्री कोरोनाच्या आढावा बैठका घेऊन ऑक्सिजन, रेमडीसिवरचा आढावा घेतात पण कार्यवाही शुन्य आहे. त्यापेक्षा बदल्यात कमविलेल्या पैशातून कोविड सेंटर सुरु करावेत. शासनाच्या पैशातून सुरु असलेल्या कोविड सेंटरवर पाट्या लावू नयेत, असा टोला खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी महसुल मंत्रीबाळासाहेब थोरात यांचे नाव थोरातांना लगावला आहे.
विखे यांनी कोळगाव पिंपळगाव पिसा, घारगाव, लोणीव्यंकनाथ मढेवडगाव, कोविड सेंटरला काष्टी येथील ऑक्सिजन प्रकल्पास भेट दिली. यावेळी ते बोलत होते. विखे लोकसहभागातून सुरु असलेल्या सर्व कोविड सेंटरला प्रत्येकी 50 हजाराची मदत केली.
सुजय विखे पुढे म्हणाले की, श्रीगोंदा तालुक्यातील गावगावच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून कोविड सेंटर सुरु केले ही आनंदाची बाब आहे. इतर तालुक्यात अशी कोविड सेंटर सुरु झाली तर शहरात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांचा लोंढा थांबेल.
बाळासाहेब नाहाटा व त्यांच्या सहकाऱ्यांनी तर या कामात स्वत:ला वाहून घेतले. या काळात जे कार्यकर्ते मदत करत त्यांना समाज कधीच विसरणार नाही. बाळासाहेब नाहाटा तुम्ही आणखी वेगाने काम करा आणखी मदत करीन, असेही विखे म्हणाले.
भाजपकडे रेमडीसिवर इंजेक्शन कोठून आली?
सुजय विखे म्हणाले की रेमडीसिवर इंजेक्शनशी भाजपाचा कोणताही संबंध नाही. विखे पाटील घराण्याचे काही उद्योगपतीशी संबध आहेत. आमच्या काॅलेजमध्ये शिकून काहींनी कंपन्या टाकल्या. त्यामुळे विमानाने दोन हजार रेमडीसिवर इंजेक्शन आणली आणि रुग्णांना दिली. डाॅक्टरांनी गरज असेल तरच रेमडीसिवर इंजेक्शन द्यावे. विनाकारण रेमडीसिवर इंजेक्शन देऊ नये.
यावेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी राहुल जगताप, भैय्या लगड, हेमंत नलगे, डाॅ. चंद्रशेखर कळमकर, प्रविण मुनोत, मनेश पाटील, विजय नलगे, लालासाहेब काकडे, रमेश खोमणे आदी उपस्थित होते.