नेवाशातील प्रश्नांबाबत मंत्री गडाखांनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:21 IST2021-05-19T04:21:47+5:302021-05-19T04:21:47+5:30
आरोग्यमंत्री टोपे यांच्या दालनात नेवासा तालुक्यातील आरोग्य सेवेच्या बाबतीत बैठक घेण्यात आली. यावेळी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, आरोग्य सेवा संचालक ...

नेवाशातील प्रश्नांबाबत मंत्री गडाखांनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट
आरोग्यमंत्री टोपे यांच्या दालनात नेवासा तालुक्यातील आरोग्य सेवेच्या बाबतीत बैठक घेण्यात आली. यावेळी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, आरोग्य सेवा संचालक साधना तायडे आदी उपस्थित होते. भेंडा आरोग्य केंद्राचा विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव सादर झाला असून, माका येथे नवीन प्राथमिक आरोग्य मंजूर करणेबाबत आरोग्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. माका, घोगरगाव, नेवासा बुद्रूक, टोका येथे उपकेंद्र मिळण्याच्या दिशेने सुरुवात झाली आहे. अपघातग्रस्तांना अत्यावश्यक सेवा उपलब्ध होण्यासाठी ट्रामा सेंटरची मागणी गडाख यांनी केली होती. त्याप्रमाणे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले गेले आहेत. कुकाणा व सोनई प्राथमिक केंद्राअंतर्गत लोकसंख्या सुमारे ६० हजार आहे. म्हणून या आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन होऊन ग्रामीण रुग्णालय करण्याची विनंती गडाख यांनी केली. त्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी तत्काळ सूचना देऊन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. तालुक्यातील नादुरुस्त आरोग्य केंद्र, उपकेंद्र याबाबत दुरुस्तीच्या कामांना निधी उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मंत्री टोपे यांनी पत्र दिले आहे. टोका व नेवासा खुर्द इमारती जीर्ण झाल्याने नवीन इमारत बांधकाम करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देखील विभागाला दिल्या आहेत. नेवासा फाटा येथे चालू असलेल्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसाठी आणखी सुविधा कशा उपलब्ध होतील याचीही चर्चा बैठकीत झाली.
180521\gadakh 01.jpg~180521\gadakh 02.jpg
नेवासा तालुक्यातील प्रश्नांबाबत ना. गडाख यांनी घेतील आरोग्यमंत्री टोपे यांची भेट~नेवासा तालुक्यातील प्रश्नांबाबत ना. गडाख यांनी घेतील आरोग्यमंत्री टोपे यांची भेट