दरोडेखोरांची टोळी संगमनेरमध्ये जेरबंद
By Admin | Updated: May 8, 2016 23:55 IST2016-05-08T23:47:45+5:302016-05-08T23:55:17+5:30
संगमनेर : शहर पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली दरोडेखोरांची टोळी नाशिक-पुणे महामार्गावरील मालुंजकर चौफुलीवर जेरबंद केली.

दरोडेखोरांची टोळी संगमनेरमध्ये जेरबंद
संगमनेर : शहर पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली दरोडेखोरांची टोळी नाशिक-पुणे महामार्गावरील मालुंजकर चौफुलीवर जेरबंद केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.
रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास शहर पोलिसांची रात्रीची गस्त सुरू होती. दरम्यान, घुलेवाडी शिवारात नाशिक-पुणे महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर मालुंजकर चौफुलीवर ५ तरूण फिरताना आढळून आले. पोलिसांनी हटकले असता त्यांच्या हालचालीवरून संशय बळावला. झाडाझडती घेतल्यावर १ लोखंडी टॉमी, तलवार, लाल मिरची पूड, स्क्रू ड्रायव्हर अशा वस्तू त्यांच्याजवळ सापडल्या. सदर तरूण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात येताच पोसिलांनी त्यांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल ईस्माइल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी उमेश प्रकाश पाथरकर (वय १९, रा. अकोले नाका, सचिन मधूकर बल्लाळ (वय १९), रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर), किरण भाऊसाहेब सकट (वय २०, रा. वार्ड नंबर २ श्रीरामपूर व आणखी दोघे अनोळखी इसम अशा एकूण पाच जणांविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचपैकी वरील तिघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनय सरवदे करीत आहेत. (प्रतिनिधी)