एमआयडीसीमुळे गावकारभाऱ्याचे वाढले महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:33 IST2021-02-05T06:33:57+5:302021-02-05T06:33:57+5:30

वाघुंडे बुद्रुक मध्ये सत्तारूढ गटाला शह देत अपक्ष उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली. परंतु आता सरपंचपदाचे आरक्षण निघाले त्यात सरपंचपद ...

MIDC has increased the importance of villagers | एमआयडीसीमुळे गावकारभाऱ्याचे वाढले महत्त्व

एमआयडीसीमुळे गावकारभाऱ्याचे वाढले महत्त्व

वाघुंडे बुद्रुक मध्ये सत्तारूढ गटाला शह देत अपक्ष उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली. परंतु आता सरपंचपदाचे आरक्षण निघाले त्यात सरपंचपद अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव निघाले आहे. या प्रवर्गाचा कोणीही उमेदवार निवडणुकीत विजयी झाला नाही. प्रभाग १ मधून अनुसूचित जाती प्रवर्गातील पुरुष उमेदवार संदीप वाघमारे विजयी झाले. त्यामुळे सध्या तरी वाघुंडे बुद्रुक येथील सरपंचपद रिक्त ठेवण्यात येईल. इतर गावच्या सर्व सरपंच निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रिक्त पदाबाबत जिल्हाधिकारी यांना अहवाल प्राप्त झाल्यावर ते निर्णय घेतील अशी माहिती उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली. अपक्षांनी बाजी मारलेल्या निवडणुकीत प्रभाग १ मधून तीनही अपक्ष विजयी झाले. तर प्रभाग २ मधून आपलाच एक समर्थक विजयी झाल्याचा दावा नवनिर्वाचित सदस्य गणेश रासकर यांनी केला आहे. आरक्षण बदल झाले तरी आपलाच माणूस सरपंच होईल. उपसरपंचपद आपल्याकडे घेण्याचा मनोदय रासकर यांनी व्यक्त केला आहे. सरपंचपद अनुसूचित जाती पुरुषसाठी निघाले तर संदीप वाघमारे याना संधी दिली जाणार असल्याचे संकेत रासकर यांनी दिले.

....

यापूर्वी थेट जनतेतून निवडून येणारा सरपंच त्याला निवडीसाठी बहुमताच्या पाठिंब्याची गरज नसल्याने लोकांनी ठरवलेली व्यक्ती गावचा प्रथम नागरिक सरपंच निवडला जात असे. आता सदस्यांच्या बहुमताच्या जोरावर हे पद मिळवता येत असल्याने सदस्यांना सरपंच निवडीत महत्त्व प्राप्त झाले आहे. सदस्य संख्येतील महिला सदस्यांचा वाढता आकडा व आरक्षणात मिळालेल्या सरपंचपदाच्या संधीने महिला राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकतील. असे असले तरी सदस्य, सरपंच, उपसरपंच महिला असतील तर त्यांनाच स्वतंत्रपणे कारभार पाहू द्यावा. इतरांची त्यात लुडबूड नसावी. तशी व्यवस्था होणे गरजेचे आहे.

-अश्विनी थोरात, उपाध्यक्षा, सरपंच परिषद.

.....

Web Title: MIDC has increased the importance of villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.