एमआयडीसीत गैरव्यवहार; शिवसेनेचे उपोषण
By Admin | Updated: May 27, 2016 23:25 IST2016-05-27T22:54:38+5:302016-05-27T23:25:56+5:30
शुक्रवारी शिवसेनेच्यावतीने एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले़

एमआयडीसीत गैरव्यवहार; शिवसेनेचे उपोषण
अहमदनगर : औद्योगिक विकास महामंडळाच्या येथील उपअभियंता कार्यालयातील गैरव्यवहार व अनधिकृत कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी शुक्रवारी शिवसेनेच्यावतीने एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले़ शिवसेनेचे नगर तालुकाप्रमुख अविनाश कोतकर यांच्यासह उद्योजक व कार्यकर्ते या उपोषणात सहभागी झाले होते़
नागरिकांच्या अधिकारानुसार कोणत्याही उद्योजकांचे काम उपअभियंता कार्यालयाकडून होत नाही, कामांसाठी सदर कार्यालयीन प्रमुखांकडून पैशाची मागणी केली जाते, औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे, नवीन रस्त्यांची कामे दाखवून खोटी बिले काढण्यात आली़ एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात मटका व दारुविक्रीचा व्यवसाय चालतो, अतिक्रमणधारकांना अभय दिले जाते़ एमआयडीसीमधील बांधकामाची मुदत संपताना उद्योजकांकडून बीसीसी प्रमाणपत्र देताना एकाचवेळी १ ते २ महिन्याच्या कालावधीसाठी १५० भूखंड धारकांकडून संबंधित अधिकाऱ्याने पैसे घेतलेले आहेत, आदी मागण्या उपोषणकर्त्यांनी निवेदनाव्दारे केल्या आहेत. या उपोषणात बाळासाहेब कोतकर, संदीप वळसे, भाऊसाहेब वेताळ, मुरलीधर कोतकर, उद्योजक बाळासाहेब विश्वासराव, प्रशांत मदने, संजय चौधरी सहभागी होते.