शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'मीच नगरचा खासदार अन् आमदार; कुणाच्या दारात जायची गरज नाही!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 12:31 IST

यापुढे नगर तालुक्याला कोणाच्या दारात जावे लागणार नाही. नगर तालुक्याला आमदार आणि खासदार मीच राहणार आहे. साकळाईबाबत मनात संशय ठेऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच या योजनेच्या भूमिपूजनासाठी आणणार असल्याचे डॉ.सुजय विखे यांनी सांगितले.

अहमदनगर : नगर तालुक्याला तीन आमदार आहेत. पण लक्ष कोणीच देत नाही. ही नगर तालुक्याच्या जनतेची ओरड आहे. यापुढे नगर तालुक्याला कोणाच्या दारात जावे लागणार नाही. नगर तालुक्याला आमदार आणि खासदार मीच राहणार आहे. साकळाईबाबत मनात संशय ठेऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच या योजनेच्या भूमिपूजनासाठी आणणार असल्याचे डॉ.सुजय विखे यांनी सांगितले.नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील एका कार्यक्रमात विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार दादा पाटील शेळके होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, अनिता हराळ, बाळासाहेब हराळ, संजय कोतकर, पल्लवी कुताळ, प्रवीण कोकाटे, प्रवीण कोठुळे, रवींद्र भापकर, संजय गिरवले, दत्ता नारळे, राजाराम भापकर गुरुजी उपस्थित होते. साकळाई योजनेचा वापर फक्त राजकारणासाठी करण्यात आला आहे. काहींनी २० वर्षे यावर राजकारण करीत निवडणुका लढवल्या. रस्त्यावर बसून किंवा आंदोलन करून साकळाईचा प्रश्न सुटणार नाही. साकळाईचा दिलेला शब्द पूर्ण केल्याशिवाय मी परत तुमच्याकडे मते मागायला येणार नाही असे आश्वासन विखे यांनी दिले.विखे कुटुंबाला राजकारणातून संपविण्याचा काहींनी प्रयत्न केला. सुजय खासदार झाला तर आपल्याला त्याच्या दारात जावे लागेल म्हणून मला विरोध झाला. पण ज्यांनी विखे कुटुंब संपविण्याचा प्रयत्न केला आज त्यांची अवस्था पहा. त्यांच्या पक्षात माणसे राहिली नाहीत. राज्याचे वाटोळे कोणी केले असेल तर ते फक्त राष्ट्रवादीने केले. कोट्यवधीचे घोटाळे केले. आता येत्या तीन महिन्यात त्यांना जेलमध्ये जावे लागणार आहे, अशी टीका त्यांनी राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांवर केली. देखण्या माणसाला फक्त पहायला जा च्अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी साकळाईबाबत केलेल्या आंदोलनाचा धागा पकडत डॉ विखे म्हणाले, देखणा माणूस आला तर त्याला फक्त पहायला जात जा. पण साकळाई फक्त सुजय विखेच करू शकतो. अन्य कोणाचे ते काम नाही, अशा शब्दात त्यांनी सय्यद यांचे नाव न घेता टीकास्र सोडले.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेAhmednagarअहमदनगर