नगर तालुक्यातील कामरगाव ग्रामस्थांना मीटरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 16:27 IST2018-10-02T16:27:23+5:302018-10-02T16:27:28+5:30
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कामरगावचे सरपंच सीमा साठे यांनी पुढाकार घेऊन गावात वॉटर मीटर बसवले.

नगर तालुक्यातील कामरगाव ग्रामस्थांना मीटरने पाणीपुरवठा
निंबळक : पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कामरगावचे सरपंच सीमा साठे यांनी पुढाकार घेऊन गावात वॉटर मीटर बसवले. नागरिकांना वेळेवर मुबलक पाणीपुरवठा होणार असल्याचे गणेश साठे यांनी सांगितले.
कामरगाव (ता.नगर) येथे विविध विकास कामांचा शुभारंभ कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब साठे, गोरख साठे, सरपंच सीमा गणेश साठे, उपसरपंच अनिल आंधळे, शिवाजी साठे, सदस्य हबीब शैख, दत्ता साठे, बबन भुजबळ, शामराव आंधळे, भाऊसाहेब दळवी, गणेश बनकर, प्रशांत साठे, शिवा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. गावामध्ये पाण्याचा दुरुपयोग जास्त होत होता. पाणी पाच ते सहा दिवसातून सुटत होते. नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत होते. हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी १२.५० लाख रुपये खर्च करून गावामध्ये वॉटर मीटर बसवण्याचे काम सुरू करण्यात आले. या वॉटर मीटर मुळे दोन दिवसाला पाणी पुरवठा होणार आहे.