प्रभू येशूंनी दिला एकतेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:36 IST2020-12-12T04:36:54+5:302020-12-12T04:36:54+5:30
शुक्रवारी (दि.११) येथील शासकीय विश्रामगृहात असोसिएशन ऑफ इंटीग्रेटेड ख्रिश्चन कौन्सिलच्या महाराष्ट्र राज्याच्या कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आ. विखे ...

प्रभू येशूंनी दिला एकतेचा संदेश
शुक्रवारी (दि.११) येथील शासकीय विश्रामगृहात असोसिएशन ऑफ इंटीग्रेटेड ख्रिश्चन कौन्सिलच्या महाराष्ट्र राज्याच्या कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आ. विखे यांच्या उपस्थितीत झाला. असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. हानौख गेरा, महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब साळवे, फादर तान्हाजी पाडळे, फादर प्रभूदास मनोहरे, फादर विकास संगमे उपस्थित होते. विखे यांच्या हस्ते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
विखे म्हणाले, राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणत्याही पदाचा स्वीकार करताना येणारी जबाबदारी जाणून घेतली पाहिजे. ख्रिश्चन समाजाची परंपरा खूप मोठी असल्याने विचारधारा तत्त्व आणि मूल्यांची जोपासना करत या समाजातील सर्वच घटकांनी प्रगती साध्य केली. प्रभू येशूंनी आपल्या सर्वांनाच एकतेचा संदेश दिला. कोणताही धर्म मानवतेच्या कल्याणाचाच विचार सांगत असल्याने मानवतेच्या सेवेसाठी असोसिएशनने भविष्यात प्रयत्न करावेत. समाजाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मागील काळात सरकारकडे आपण व्यक्तिगत पाठपुरावा केला होता. अन्य मागण्यांबाबत येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्य सरकारकडे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे आपण प्रश्नांसाठी पाठपुरावा करू.