मर्चंटस्‌ बँकेच्या चितळे रोड शाखेचा वर्धापन दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:25 IST2021-08-14T04:25:09+5:302021-08-14T04:25:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : येथील अहमदनगर मर्चंट बँकेच्या चितळे रोड शाखेचा २६ वा वर्धापन दिन बँकेचे उपाध्यक्ष सुभाष ...

Merchants‌ Anniversary of Chitale Road Branch of the Bank | मर्चंटस्‌ बँकेच्या चितळे रोड शाखेचा वर्धापन दिन साजरा

मर्चंटस्‌ बँकेच्या चितळे रोड शाखेचा वर्धापन दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : येथील अहमदनगर मर्चंट बँकेच्या चितळे रोड शाखेचा २६ वा वर्धापन दिन बँकेचे उपाध्यक्ष सुभाष बायड, ज्येष्ठ संचालक आनंदराम मुनोत यांच्या हस्ते केक कापून साजरा केला. यावेळी बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. गुरुवारी झालेल्या या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी संचालक संजय बोरा, सी.ए., अजय मुथा, अमित मुथा, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन भंडारी, कर्मचारी संचालक संदीप लोढा, शाखा व्यवस्थापक अनंत होशिंग, अधिकारी अनिल छजलाणी, कमलेश उबाळे, राजेंद्र क्षेत्रे, अवधूत गर्जे, मनोज निरफराके, नेत्रा केदारे, दत्ता दळवी, किरण माने, संतोष गिते, पंकज धर्माधिकारी, महावीर डागा, शुभम गुगळे, विलास धस आदी उपस्थित होते.

यावेळी शाखेचे सेव्हिंग खातेदार दिलिप मुथा, चालू ठेव खातेदार जयंत देशमुख, अनंत नगरकर यांचाही प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. चांगल्या कामासाठी रोखपाल कमलेश उबाळे, राजेंद्र क्षेत्रे, महावीर डागा यांचा गौरव करण्यात आला. चेअरमन अनिल पोखरणा हे परगावी असल्याने त्यांनी दूरध्वनीवरून शाखा व्यवस्थापक अनंत होशिंग व सर्व कर्मचारी, खातेदारांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बायड म्हणाले, सहकारातील आदरणीय व्यक्तिमत्त्व हस्तीमलजी मुनोत यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे अहमदनगर मर्चंटस्‌ को-ऑप. बँक सहकारी बँकिंगमध्ये आदर्शवत मानली जाते. चितळे रोड शाखा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून सायंकाळीही बँकेचे कामकाज सुरू राहत असल्याने व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक, नोकरदार अशा सर्वच खातेदारांना चांगली सुविधा मिळते. उपस्थितांचे स्वागत शाखा व्यवस्थापक अनंत होशिंग यांनी केले. अनिल छजलानी यांनी आभार मानले. (वा. प्र.)

--

फोटो- १२ मर्चंट बँक

मर्चंट बँकेच्या चितळे रोड शाखेचा २६ वा वर्धापन दिन केक कापून साजरा करताना संचालक व अधिकारी-कर्मचारी.

Web Title: Merchants‌ Anniversary of Chitale Road Branch of the Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.