‘मर्चंट’ने संस्थेत गटातटांचे राजकारण आणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:37 IST2021-03-13T04:37:37+5:302021-03-13T04:37:37+5:30
असोसिएशनची ७३ वी वार्षिक सभा अध्यक्ष विशाल फोफळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पानसरे यांनी कामकाजाविषयी जाहीर नाराजी व्यक्त ...

‘मर्चंट’ने संस्थेत गटातटांचे राजकारण आणले
असोसिएशनची ७३ वी वार्षिक सभा अध्यक्ष विशाल फोफळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पानसरे यांनी कामकाजाविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली.
पानसरे म्हणाल्या, संस्थेने केवळ मर्जीतील व्यापाऱ्यांना सभासदत्व दिले. सभासदत्वासाठी शुल्क कमी केले नाही. असोसिएशनने व्यापारी हितासाठी काम केले पाहिजे. मात्र गटबाजी केली जात आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊनचे आवाहन करताना नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या छायाचित्राचा वापर अध्यक्ष पोफळे यांनी केला. आदिक यांची मदत घेतली. मात्र सभेला त्यांना निमंत्रित केले नाही.
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार भानुदास मुरकुटे व उपनगराध्यक्ष करण ससाने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी करण ससाने यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष विशाल पोफळे यांनी प्रास्तविक केले. ज्येष्ठ संचालक रमण मुथ्था, श्रीनिवास बिहाणी, संजय छल्लारे व कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी मनोगत व्यक्त केले. सचिव नीलेश ओझा यांनी आभार मानले.
उपाध्यक्ष उमेश अग्रवाल, अमोल कोलते, विलास बोरावके, सुनील गुप्ता, राजेश अलघ, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, प्रवीण गुलाटी, नितीन ललवाणी, राजेश कासलीवाल, राहुल मुथ्था, मुकेश कोठारी, प्रेमचंद कुंकूलोळ, दिलीप नागरे, भगवान उपाध्ये, गौतम उपाध्ये, प्रशांत देशमुख, आदी उपस्थित होते.
--------