उष्माघाताने व्यापाऱ्याचा मृत्यू
By Admin | Updated: May 20, 2016 23:58 IST2016-05-20T23:48:57+5:302016-05-20T23:58:16+5:30
शेवगाव : शेवगाव शहरातील गेवराई रस्त्यावरील राजू नामदेव बोरुडे (वय ४५) या म्हशीच्या व्यापाऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली

उष्माघाताने व्यापाऱ्याचा मृत्यू
शेवगाव : शेवगाव शहरातील गेवराई रस्त्यावरील राजू नामदेव बोरुडे (वय ४५) या म्हशीच्या व्यापाऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. शेवगाव तालुक्यात गेल्या २ दिवसात उष्णतेच्या तडाख्याने मरण पावलेल्यांची संख्या २ झाली आहे.
बोरुडे यांना अस्वस्थ वाटू लागले. खासगी रुग्णालयातून त्यांना उष्माघाताचा प्रकार असल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे वृध्द वडील, पत्नी, दोन भाऊ, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. वडुले बुद्रूक येथील आदिनाथ इंद्रसेन दारकुंडे (वय २९) यांचा बुधवारी उष्माघाताने मृत्यू झाला होता.