जैन संघाच्या सभासदांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:24 IST2021-03-01T04:24:27+5:302021-03-01T04:24:27+5:30
श्रीरामपूर : येथील श्री स्थानकवासी जैन संघ या विश्वस्त संस्थेने २०१८ मध्ये सदस्यत्व शुल्क भरलेल्या सभासदांना २८ फेब्रुवारीपर्यंत नोंदवहीमध्ये ...

जैन संघाच्या सभासदांना
श्रीरामपूर : येथील श्री स्थानकवासी जैन संघ या विश्वस्त संस्थेने २०१८ मध्ये सदस्यत्व शुल्क भरलेल्या सभासदांना २८ फेब्रुवारीपर्यंत नोंदवहीमध्ये सह्या करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भाव आणि धार्मिक कार्यक्रमांतील व्यस्ततेमुळे त्यास १५ मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी भाजप नेते अमित मुथ्था यांनी केली आहे.
समाजाचे अल्पमतातील विश्वस्त रमेश लोढा, विजयकुमार चोरडिया व कल्याण कुंकुलोळ यांनी स्वाक्षरीसाठी जाहीर आवाहन केले आहे. मुदतीत स्वाक्षरी केली नाही, तर त्यांची सभासद होण्याची इच्छा नाही, असे ग्राह्य धरण्यात येईल, असे या विश्वस्तांनी पत्रकात नमूद केले आहे. ते कायद्याला धरून नाही, असे मुथ्था यांनी म्हटले आहे.
विश्वस्त संस्थेने २०१८ मध्ये सभासदत्वासाठी शुल्क स्वीकारले आहे. दोन वर्षांचा कालावधी होऊन गेला आहे. त्यामुळे शुल्क भरल्यानंतर सभासदत्व प्राप्त झाले आहे. त्याकरिता ठरावीक मुदतीत स्वाक्षरी करण्याचे आवाहन हे नियमबाह्य आहे. त्यामुळे स्वाक्षरीसाठी विश्वस्तांनी सभासदांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे.
विश्वस्तांनी २०१८ मध्ये काही कुटुंबीयांकडून सभासद शुल्क स्वीकारले नाही. १८ वयापेक्षा अधिक वयाच्या तरुणांना सभासदत्व द्यावे, असेही मुथ्था यांनी म्हटले आहे.