अहमदनगरमध्ये संभाजी भिडेंची पोलिस बंदोबस्तात सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 12:40 IST2018-06-10T12:22:26+5:302018-06-10T12:40:37+5:30
शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांची शहरातील टिळक रोडवरील सभेसाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अहमदनगरमध्ये संभाजी भिडेंची पोलिस बंदोबस्तात सभा
अहमदनगर : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांची शहरातील टिळक रोडवरील सभेसाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
भिडे यांच्या सभेला आंबेडकरवादी संघटनांसह भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही विरोध केला होता. यामुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चौकाचौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. टिळक रोडला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आरपीआय पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या होत्या. मात्र या नोटीसा झुगारून संभाजी भिडे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आंबेडकरी संघटनांनी मोर्चा काढला होता. सभेला विरोध करण्यासाठी आरपीआय व इतर संघटनांनी काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवत कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.