दहिगावनेत स्वाभिमानी मराठा महासंघाची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:28 IST2021-09-10T04:28:22+5:302021-09-10T04:28:22+5:30
दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथे शेवगाव तालुका स्वाभिमानी मराठा महासंघाची घोंगडी बैठक गुरुवारी पार पडली. अध्यक्षस्थानी शेवगाव तालुका ...

दहिगावनेत स्वाभिमानी मराठा महासंघाची बैठक
दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथे शेवगाव तालुका स्वाभिमानी मराठा महासंघाची घोंगडी बैठक गुरुवारी पार पडली. अध्यक्षस्थानी शेवगाव तालुका भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस लक्ष्मण काशीद होते. यावेळी संघटनेच्या वतीने येणाऱ्या काळात आरक्षणप्रश्नी घ्यावयाच्या भूमिकेबाबत विचारमंथन झाले. संघटनेचा विस्तार वाढवण्यासाठी अधिकाधिक घोंगडी बैठका घेऊन कार्यकर्ते जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. स्वाभिमानी मराठा महासंघाच्या शेवगाव तालुका कार्याध्यक्षपदी रांजणीचे शरद थोटे यांची निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर, ढोरसडे अंत्रेचे माजी सरपंच गुरुनाथ माळवदे, भाजपचे तालुका चिटणीस आसाराम नऱ्हे, शुक्लेश्वर कर्डिले, रामेश्वर थोरात, सचिन थोरात, अशोक शिदोरे, शिवाजी मोरे, सोमनाथ शिंदे, रामेश्वर जाधव, बाळासाहेब घुले, सकुंडे पाटील, माणिकराव शिंदे, कैलास चव्हाण, विलास चव्हाण, चंद्रकांत पवार, ज्ञानेश्वर कर्डिले, किरण जगताप, रामनाथ काशीद आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
090921\img-20210909-wa0033.jpg
दहिगावने : शेवगाव तालुका स्वाभिमानी मराठा महासंघाच्या तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शरद थोटे यांचा दहिगावनेत सन्मान करण्यात आला.