श्रीगोंदा येथे सहविचारी मुख्याध्यापक संघाची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:25 IST2021-08-22T04:25:30+5:302021-08-22T04:25:30+5:30
श्रीगोंदा : आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत श्रीगोंदा तालुका मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा श्रीगोंदा येथे नुकतीच पार पडली. ...

श्रीगोंदा येथे सहविचारी मुख्याध्यापक संघाची बैठक
श्रीगोंदा : आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत श्रीगोंदा तालुका मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा श्रीगोंदा येथे नुकतीच पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त अशोकराव होनराव होते.
तांबे म्हणाले, रखडलेल्या वेतन श्रेणी पेन्शनचा प्रश्न शालेय पोषण आहार तसेच मुख्याध्यापकांची प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा चालू आहे. यामध्ये गतिमानता आणणार आहे.
मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विश्वनाथ शेलार यांनी यावेळी शाळा व मुख्याध्यापकांच्या विविध मागण्या मांडल्या. यामध्ये दीर्घकाळ सेवा करणाऱ्या मुख्याध्यापकांना निवड श्रेणी मिळावी, शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना थेट धान्य व धान्यादी माल या स्वरूपात वाटण्याचा निर्णय व्हावा आदी मागण्या करण्यात आल्या.
सचिनराव लगड, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, संस्थेचे सचिव डॉ. अशोक खेंडके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले, समीर बोरा, स्मितल वाबळे, बी. के. लगड, नानासाहेब दळवी, प्राचार्य बंडू मखरे, शिवाजी गवळी, सुनील भोर आदी उपस्थित होते.