वीजबिल माफीसाठी ऊर्जामंत्र्यांकडे लवकरच बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST2021-02-05T06:28:00+5:302021-02-05T06:28:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमदनगर : महापालिकेला सौरऊर्जा प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र, त्यासाठी थकीत वीजबिल भरण्याची अट असून, ...

वीजबिल माफीसाठी ऊर्जामंत्र्यांकडे लवकरच बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमदनगर : महापालिकेला सौरऊर्जा प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र, त्यासाठी थकीत वीजबिल भरण्याची अट असून, याबाबत लवकरच ऊर्जामंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेणार असल्याचे खा. डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.
खा. विखे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत आढावा बैठक झाली. महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, उपायुक्त प्रदीप पठारे, संतोष लांडगे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, निखिल वारे, बाळासाहेब पवार, विलास ताठे, संजय ढोणे, मेडाचे अधिकारी व एमएसईबीचे अधिकारी आदी उपस्थित होते. विखे म्हणाले, शासनाकडून सौर ऊर्जा प्रकल्पासाठी २८ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत; परंतु मागील वर्षी कोरोनामुळे प्रकल्पाला गती मिळाली नाही. महापालिका पाणीपुरवठ्यासाठी दरमहा अंदाजे १ कोटीपर्यंत बिल भरते. सदर प्रकल्पामुळे मनपाची मोठ्या प्रमाणात रक्कम वाचणार आहे. मेडाने ६ कोटी ५० लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे. उर्वरित २१ कोटी ५० लाखांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना विखे यांनी यावेळी केल्या.
..
सूचना फोटो आहे.