चांभुर्डीच्या आरोग्य शिबिरात शंभर जणांना वैद्यकीय सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:38 IST2021-03-04T04:38:40+5:302021-03-04T04:38:40+5:30

श्रीगोंदा : सुपा येथील मायडिया कॅरिअर कंपनी, नगर येथील स्नेहालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी येथे आरोग्य ...

Medical care for hundreds at Chambhurdi health camp | चांभुर्डीच्या आरोग्य शिबिरात शंभर जणांना वैद्यकीय सेवा

चांभुर्डीच्या आरोग्य शिबिरात शंभर जणांना वैद्यकीय सेवा

श्रीगोंदा : सुपा येथील मायडिया कॅरिअर कंपनी, नगर येथील स्नेहालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

येथे शंभर जणांना वैद्यकीय सेवा देण्यात आली. आरोग्यवर्धनी उपक्रमांतर्गत मोफत आरोग्य तपासणी, प्राथमिक औषधे, वैद्यकीय सल्ला व प्राथमिक वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या. यात रक्त तपासणी व शरीराच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. १००पेक्षा जास्त रुग्णांनी शिबिराचा विविध प्रकारे लाभ घेतला.

यावेळी मायडिया कंपनीचे अधिकारी नीलेश ढगे, स्नेहालयचे जनसंपर्क अधिकारी सचिन ढोरमले, सरपंच भाऊसाहेब पुरी, उपसरपंच शिवाजी उदार, विठ्ठल वाळके, जगन्नाथ ठुबे, माजी सरपंच दादासाहेब धागे, बापुराव धागे, नीलेश धागे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष खंडेराव नाईक, पोपट ढोले, रामचंद्र नाईक, श्रीनिवास नाईक आदी उपस्थित होते.

Web Title: Medical care for hundreds at Chambhurdi health camp