आज होणार प्रवरेतील वाळू उपशाचे मोजमाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 10:21 IST2018-06-13T10:20:57+5:302018-06-13T10:21:17+5:30
प्रवरा नदीपात्रातील जातप व करजगाव (ता.राहुरी) येथील वाळू उपशाचे मोजमाप करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी दिले आहेत.

आज होणार प्रवरेतील वाळू उपशाचे मोजमाप
श्रीरामपूर : प्रवरा नदीपात्रातील जातप व करजगाव (ता.राहुरी) येथील वाळू उपशाचे मोजमाप करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी दिले आहेत. जातप येथे बेकायदा वाळू उपशाप्रकरणी आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम ठेकेदारांच्या जमिनीचा लिलाव करून वसूल केली जाणार आहे. आज पोलीस बंदोबस्तात होणाऱ्या मोजमापाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव येथील काही तरुणांनी वाळू उपशाला नदीपात्रात उतरत विरोध दर्शविला होता. मात्र जेसीबी चालकाने तरुणांवर राहुरी पोलीस ठाण्यात थेट दंगलीचे गुन्हे दाखल केले. त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली होती.
अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी जिल्हाधिकारी प्रशांत पाटील, तहसीलदार सुभाष दळवी यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांशी चर्चा झाली. यावेळी सरपंच गीताराम खरात, उपसरपंच अतुल खरात, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आबासाहेब खरात, पोलीस पाटील धनंजय खरात, अशोक कारखाना ऊस वाहतूक संस्थेचे संचालक रावसाहेब खरात, हनुमंत खरात हे उपस्थित होते. ग्रामस्थांवर खोटे खटले दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत़ त्यामुळे वाळूतस्करांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
गत दोन वर्षात अकोलेत प्रवरा नदी पात्रातून रेडे, सुगाव, कळस येथील वाळू उपशासाठीचे लिलाव झाले नाहीत. कळस गावकºयांचा वाळू लिलावास विरोध आहे. तर इतर दोन ठिकाणच्या वाळू लिलावास पर्यावरण, भूजल सर्वेक्षण समितीची मान्यता नाही. अवैध वाळू रोखण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
- मुकेश कांबळे, तहसीलदार