व्हिडिओकॉन पुन्हा सुरू करण्याची महापौरांची मागणी

By Admin | Updated: June 6, 2014 13:41 IST2014-06-05T19:40:34+5:302014-06-06T13:41:56+5:30

नगरमधून औरंगाबाद शहरात स्थलांतरित झालेल्या व्हिडिओकॉन कंपनीचे नगरमधील युनिट पुन्हा सुरू करण्याची मागणी महापौर संग्राम जगताप यांनी केली आहे.

Mayor's demand to restart Videocon | व्हिडिओकॉन पुन्हा सुरू करण्याची महापौरांची मागणी

व्हिडिओकॉन पुन्हा सुरू करण्याची महापौरांची मागणी

अहमदनगर: नगरमधून औरंगाबाद शहरात स्थलांतरित झालेल्या व्हिडिओकॉन कंपनीचे नगरमधील युनिट पुन्हा सुरू करण्याची मागणी महापौर संग्राम जगताप यांनी केली आहे़ याविषयी लवकरच नगरला भेट देऊन सकारात्मक उपाय योजना करण्याचे आश्वासन संचालक वेणूगोपाळ धूत यांनी यावेळी दिले़
येथील बुर्‍हाणनगर व बुरुडगावमध्ये व्हिडिओकॉन कंपनी सुरू होती़ परंतु ती बंद करून स्थलांतरित झाली़ त्यामुळे शेकडो युवक बेरोजगार झाले आहेत़ या पार्श्वभूमीवर महापौर संग्राम जगताप यांनी व्हिडिओकॉनचे संचालक वेणूगोपाळ धूत यांची मुंबईत भेट घेतली़ यावेळी जगताप यांनी नगर शहरातील कंपनी पुन्हा सुरु करावी, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल़ तसेच कंपनीला त्रास देणार्‍यांचाही चोख बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी खात्री जगताप यांनी दिली़ त्यावर नगर शहराला लवकरच भेट देऊ़ युनिट सुरू करण्याबाबत सकारात्मक पावले उचलले जातील,असे आश्वासनही धूत यांनी दिले़
आंतरराष्ट्रीय दर्जाची ही कंपनी आहे़या कंपनीची सुरुवात नगर शहरातून झाली़ मात्र सध्या या कंपनीचे नगरमध्ये एकही युनिट नाही़ नगर शहरात ही कंपनी नव्याने सुरू झाल्यास मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होईल़ तसेच इतर मोठ्या कंपन्या येथे येण्याची तयारी दर्शवतील़ त्यामुळे ही कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी महापौर जगताप यांनी प्रयत्न सुरू केले केले आहेत़त्यामुळे युवकांच्या आशा पल्लवित झाल्या असून, नगरच्या उद्योगालाही चांगले दिवस येण्याची चिन्हे आहेत़

Web Title: Mayor's demand to restart Videocon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.