शहरविकासासाठी महापौर वाकळे गेले दिल्लीला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 19:19 IST2019-01-10T19:18:57+5:302019-01-10T19:19:44+5:30
महापौर पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर बाबासाहेब वाकळे हे प्रथमच आज दिल्ली दिल्लीला रवाना झाले. नगर शहराच्या विकासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधीची मागणी वाकळे करणार आहेत.

शहरविकासासाठी महापौर वाकळे गेले दिल्लीला !
अहमदनगर : महापौर पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर बाबासाहेब वाकळे हे प्रथमच आज दिल्ली दिल्लीला रवाना झाले. नगर शहराच्या विकासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधीची मागणी वाकळे करणार आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या शुक्रवार व शनिवारी दिल्ली येथे होणा-या बैठकीस बाबासाहेब वाकळे उपस्थित राहणार आहेत. खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली ते दिल्लीत विविध केंद्रीय मंत्र्यांना भेटून नगर शहराच्या विकासासाठी विशेष निधीची मागणी करणार आहेत. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासमवेत माजी नगरसेवक सुरेंद्र गांधी, सरचिटणीस किशोर बोरा, संजय ढोणे दिल्लीला रवाना झाले आहेत