नगराध्यक्षा आदिक यांची तत्परता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST2021-05-28T04:16:21+5:302021-05-28T04:16:21+5:30

श्रीरामपूर : येथील नेवासा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ कंटेनरने वाहनाला जोराची धडक दिली. यात एक कार रस्त्याच्या खाली उलटली. या ...

Mayor Adik's readiness | नगराध्यक्षा आदिक यांची तत्परता

नगराध्यक्षा आदिक यांची तत्परता

श्रीरामपूर : येथील नेवासा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ कंटेनरने वाहनाला जोराची धडक दिली. यात एक कार रस्त्याच्या खाली उलटली. या दरम्यान नगराध्यक्षा अनुराधा आदिक या हरेगावकडे जात असताना त्यांनी तत्काळ कारमधील अपघातग्रस्तांना बाहेर काढून स्वतःच्या गाडीत कामगार रुग्णालयात भरती केले. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान उड्डाणपुलाजवळ कंटेनरने (एमएच ४३-यू ९६३४) कारला (एमएच २९ -आर ७४४४) धडक दिली. यामध्ये शहरातील डॉ. अतुल करवा यांच्या पत्नी डॉ. सपना करवा व जालना येथील दीपाली राजू मुंदडा या होत्या. अपघातामध्ये डॉ. मुंदडा (वय ४५) यांना मार लागला. त्यांच्यावर सध्या डॉ. रवींद्र जगधने उपचार करत आहेत.

नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी प्रसंगावधान राखत स्वत:च्या गाडीत अपघातग्रस्तांना वेळीच पोहोच केल्यामुळे त्यांना वेळीच उपचार मिळाले. अन्यथा रस्त्यावर अनेकदा मदतीसाठी वाट पाहण्याची वेळ येते.

----------

Web Title: Mayor Adik's readiness