गवंडी, हमालांच्या मुलांचा झेंडा

By Admin | Updated: June 18, 2014 01:24 IST2014-06-18T00:48:01+5:302014-06-18T01:24:10+5:30

राहुरी : राहुरी येथील प्रगती विद्यालयातील विद्यार्थी अक्षय त्रिभुवन, ज्ञानेश्वर पिसे व रवींद्र पटारे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले़

Masonry, hamala's children's flag | गवंडी, हमालांच्या मुलांचा झेंडा

गवंडी, हमालांच्या मुलांचा झेंडा

राहुरी : राहुरी येथील प्रगती विद्यालयातील विद्यार्थी अक्षय त्रिभुवन, ज्ञानेश्वर पिसे व रवींद्र पटारे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले़
अक्षय त्रिभुवनचे वडील नंदू त्रिभुवन हे गवंडी काम करतात़ अक्षयने वडिलांच्या हाताखाली बिगारी म्हणून वाळू ,सिमेंट व विटा देण्याचे काम क रून अभ्यास केला़ त्याला ८४़२० टक्के गुण मिळाले असून त्याची इंजिनिअर होण्याची इच्छा आहे़ वर्गात दुसरा आलेला ज्ञानेश्वर पिसे याचे वडील पाटीलबा हे राहुरी मार्केटमध्ये हमालीचे काम करून उपजीविका करतात़ आईस्क्रीम व कापडाच्या दुकानात काम करून शाळेचा खर्च भागवून ज्ञानेश्वरने ८३़६० टक्के गुण मिळविले आहेत़ त्याचे आदर्श शिक्षक होण्याचे स्वप्न आहे़
किडनीच्या विकाराने रवींद्र बाळासाहेब पटारे दोन महिने हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट होता़ रवींद्रचे वडील मोलमजुरी करतात़ रवींद्रने आजारावर मात करीत ७३ टक्के गुण विळविले असून त्याची शिक्षक होण्याची इच्छा आहे़ सर्वसामान्य विद्यार्थ्यांची शाळा म्हणून प्रगती विद्यालयाची राहुरी तालुक्यात ख्याती आहे़ मुख्याध्यापक जी़ जी़ जाधव, बी़ टी़ पानसंबळ, बी़ आऱ तनपुरे, ए़ जी़ तनपुरे, डी़ आऱ म्हसे या शिक्षकांचे मार्गदर्शन या मुलांना लाभले़ (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Masonry, hamala's children's flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.