तलवार बाळगणारी टोळी नगरमध्ये जेरबंद

By Admin | Updated: August 30, 2014 23:20 IST2014-08-30T23:09:20+5:302014-08-30T23:20:41+5:30

अहमदनगर: एका कारमधून आठ तलवारी आणि चाकू घेऊन नगरकडून मनमाड रोडकडे जाणाऱ्या पाच जणांच्या टोळीला एम.आय.डी. सी. पोलिसांनी शनिवारी अटक केली.

Martingale in the gang of soldiers carrying sword | तलवार बाळगणारी टोळी नगरमध्ये जेरबंद

तलवार बाळगणारी टोळी नगरमध्ये जेरबंद

अहमदनगर: एका कारमधून आठ तलवारी आणि चाकू घेऊन नगरकडून मनमाड रोडकडे जाणाऱ्या पाच जणांच्या टोळीला एम.आय.डी. सी. पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून आठ तलवारी आणि एक चाकू जप्त केला.
नगर-मनमाड रोडवरून तलवारी घेऊन जाणारी एक टोळी मनमाड मार्गावरून एका स्कॉर्पिओ गाडीतून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एम. आय.डी. सी. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी एका खासगी गाडीतून पोलीस पथकासह मनमाड रोडवर सापळा रचला आणि माहितीमध्ये मिळालेल्या वर्णनानुसारच्या स्कॉर्पिओ गाडीवर नजर ठेवली. दुपारी साडेबाराच्या सुमारास वर्णनानुसारची गाडी भरधाव वेगात जात होती. अशावेळी तिचा पाठलाग करून स्कॉर्पिओ गाडीला पोलिसांनी त्यांची खासगी गाडी आडवी लावली. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते घाबरले. कारची झडती घेतली असता कारच्या मागील सीटखाली मोठ्या सात तलवारी आढळून आल्या. तसेच एक लहान तलवार आणि एक चाकू आढळून आला.
पोलिसांनी शस्त्रांसह पाच जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी कारमधील विशाल विलास सगळगिळे, कदीर वजीरभाई इनामदार, गजाजन गणपत चव्हाण, सतीश चंद्रकांत दाभाडे आणि कुणाल सुरेश सोनवणे (सर्व रा. टाकळीमियॉ, ता. राहुरी) यांच्याविरुद्ध एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Martingale in the gang of soldiers carrying sword