सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST2021-03-07T04:19:40+5:302021-03-07T04:19:40+5:30

पती जयराम गिते, संतोष गिते हे दोघे शारदा हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन किरकोळ कारणावरून नेहमीच मारहाण करायचेय याबाबत आश्वी ...

Married woman commits suicide after being harassed by her father-in-law | सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पती जयराम गिते, संतोष गिते हे दोघे शारदा हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन किरकोळ कारणावरून नेहमीच मारहाण करायचेय याबाबत आश्वी पोलीस स्टेशनला सप्टेंबर २०२० मध्ये तिने पती विरोधात आश्वी पोलीस स्टेशनला तक्रार ही दिली होती. नातेवाइकांच्या मध्यस्थीने पुन्हा नांदायला गेली होती. दोन दिवसांपूर्वी जयराम व शारदा हाजरवाडी येथे भेटायला आले होते. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जाऊन आल्यानंतर शारदास नवीन मोबाइल फोन विकत घेऊन देत तिला सासरी पिंप्री येथे सोडले. शारदा हिला मारहाण करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने गुरुवारी मध्यरात्री विषारी औषध सेवन केले.

फिर्यादीवरून आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, गोपनीय विभागाचे विनोद गंभीरे व पोलीस पथकाने घटनेचे गांभीर्य ओळखून पती जयराम चांगदेव गिते, भाया संतोष चांगदेव गिते यांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: Married woman commits suicide after being harassed by her father-in-law