छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By Admin | Updated: November 7, 2016 00:56 IST2016-11-07T00:21:02+5:302016-11-07T00:56:03+5:30
श्रीगोंदा : माहेरहून जमीन व ट्रॅक्टर घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी सतत होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून राणी अनिल पुराने (वय ३२)

छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या
श्रीगोंदा : माहेरहून जमीन व ट्रॅक्टर घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी सतत होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून राणी अनिल पुराने (वय ३२) या विवाहितेने माहेरी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती, सासू, सासरा, दीर, भावजई अशा चार जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक लांडगे यांनी फिर्याद दिली असून, राणी हिचा दहा वर्षापूर्वी अधोरेवाडी येथील अनिल पुराने याच्याशी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी आहे़ माहेरहून ट्रॅक्टर व जमीन घेण्यासाठी ५ लाख रुपये आणावेत, यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरु होता़ पती अनिल पुराने, सासरा ज्ञानदेव पुराणे, दीर सुनील पुराणे, भावजई मनीषा पुराणे हे चौघे तिचा सातत्याने छळ करत होते.
रोज छळ होत असल्याने राणी त्रस्त झाली होती. राणी ही चोराचीवाडी येथे माहेरी आली होती. तेथेच रविवारी दुपारी तीनच्या सुमारास राणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत मोरे करत आहेत.
(तालुका प्रतिनिधी)