विवाहित प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:33 IST2021-02-05T06:33:48+5:302021-02-05T06:33:48+5:30
श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : येळपणे येथील प्रेमीयुगुलाने मनमाड-दौड लोहमार्गावरील महादेववाडी शिवारात रेल्वेखाली आत्महत्या केली आहे, ही दुर्दैवी घटना सोमवारी ...

विवाहित प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या
श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : येळपणे येथील प्रेमीयुगुलाने मनमाड-दौड लोहमार्गावरील महादेववाडी शिवारात रेल्वेखाली आत्महत्या केली आहे, ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री घडली आहे. यातील मयत हे विवाहित होते. त्यांचे एकमेकांशी विवाहबाह्य प्रेमसंबंध होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
राजू बाबा कोळपे (वय ३८) व राणी राजेंद्र साबळे (वय २८) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. राजू कोळपे व राणी साबळे दोघे विवाहित होते. दोघांना दोन-दोन मुले आहेत; पण गेल्या महिन्यापासून राजू व राणी यांचे प्रेमसंबंध जुळले. आपल्या लेकरा-बाळांचा विचार करून दोघांनी प्रेमसंबंध ठेवू नये, असा त्यांना जवळच्या हितचिंतकांनी सल्ला दिला होता. सोमवारी सकाळी ११ वाजता दोघेही घरातून बाहेर पडले. सुरुवातीला राणी साबळे ही फरार झाली असल्याची तक्रार दत्तात्रय पांढरकर यांनी बेलवंडी पोलिसांकडे केली होती. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा दोघांनी महादेववाडी शिवारात रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघड झाले. दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. श्रीगोंदा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस तपासानंतर घटनेचे कारण स्पष्ट होईल. पुढील तपास पोलीस हेड काॅन्स्टेबल विठ्ठल बढे करीत आहेत.
...
फोटो-०२ राजू कोळपे
०२राणी साबळे
..