सव्वा रुपयात विवाह
By Admin | Updated: August 7, 2014 00:07 IST2014-08-06T23:59:42+5:302014-08-07T00:07:03+5:30
अहमदनगर : येथील श्री श्रमिक बालाजी मंदिर ब्रम्होत्सवाच्या पाचव्या दिवशी श्री बालाजी कल्याणम् सोहळ्यानिमित्त सव्वा रुपयात तेरा जोडप्यांचे सामुदायिक विवाह करण्यात आले़

सव्वा रुपयात विवाह
अहमदनगर : येथील श्री श्रमिक बालाजी मंदिर ब्रम्होत्सवाच्या पाचव्या दिवशी श्री बालाजी कल्याणम् सोहळ्यानिमित्त सव्वा रुपयात तेरा जोडप्यांचे सामुदायिक विवाह करण्यात आले़ यानिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली़
बुधवार (दि़६) सकाळी ७ वाजता श्री बालाजीला जलघटा अभिषेक करण्यात आला़ ९ वाजता होमहवन करण्यात आले़ त्यासाठी पद्मशाली समाजातील २० जोड्या बसविण्यात आल्या होत्या़ होमहवन करुन पुर्णाहुती देण्यात आली़ १० वाजता सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली़ ११ वाजता श्री बालाजींच्या कल्याणम् (लग्न) सोहळ्यानिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली़ आ़ अनिल राठोड यांच्या हस्ते पालखीस प्रारंभ झाला़ पालखीची सवाद्य मिरवणूक काढल्यानंतर बालाजी-पद्मावती-लक्ष्मी यांचा लग्न सोहळा पार पडला़ श्री बालाजींचा कल्याणम् सोहळा पुजारी चंद्रय्या मंचे व नरसय्या नल्ला यांच्या उपस्थितीत करण्यात आला़ या सोहळ्यात श्रीनिवास बोजा, प्रकाश दुलम, श्रेणिक कटारिया यांनी सहभाग घेतला़ त्यानंतर सामाजिक विवाह सोहळ्यात १३ वधू-वरांचे विवाह करण्यात आले़
यावेळी आ़ राठोड, महापौर संग्राम जगताप, माजी महापौर शीला शिंदे, नगरसेवक मनोज दुलम, विक्रम राठोड, सत्यजीत तांबे, ब्रिजलाल सारडा, रविंद्र कटारिया, मंदिराचे अध्यक्ष विनोद म्याना, उपाध्यक्ष संजय पेगड्याल, राजू येमूल, दत्तात्रय कुंटला, कैलास लक्कम, शंकर येमुल, रमेश कोडम, श्याम बोगा, लक्ष्मण आकुबत्तीन, राजू गड्डम, अशोक इप्पलपेल्ली, नारायण यन्नम, ज्ञानेश्वर सुंकी, बळीराव कोलपेक, रमाकांत गाडे, त्रिलेश येनगुंदुल, देवीदास संभार, संजय बाले, चंद्रकांत दुलम, किसनराव बोमादंडी, जालिंदर गुरप, शिवराम श्रीगादी आदी उपस्थित होते.