राहात्याच्या धर्तीवर आसाममध्ये बाजार समित्या
By Admin | Updated: July 21, 2016 23:54 IST2016-07-21T23:50:57+5:302016-07-21T23:54:13+5:30
राहाता : राहाता बाजार समितीच्या धर्तीवर आसाममध्येही अद्ययावत बाजार समित्या निर्माण करण्याचा मनोदय, आसामचे उद्योग संचालक तपन डेका यांनी व्यक्त केला़

राहात्याच्या धर्तीवर आसाममध्ये बाजार समित्या
राहाता : राहाता बाजार समितीतील व्यवहार, शेतकऱ्यांचे समाधान आदी बाबींचा अभ्यास करून या बाजार समितीच्या धर्तीवर आसाममध्येही अद्ययावत बाजार समित्या निर्माण करण्याचा मनोदय, आसामचे उद्योग संचालक तपन डेका यांनी व्यक्त केला़
आसाम राज्याच्या उद्योग संचालकांसह आलेल्या शिष्टमंडळाने राहाता बाजार समितीला भेट देऊन पाहणी केली़ यावेळी बाजार समितीचे सभापती बापुसाहेब आहेर, उपसभापती वाल्मीक गोर्डे यांनी आसामचे उद्योग संचालक तपन डेका, कृषी तज्ज्ञ गौतम गोस्वामी, मार्के ट व्यवस्थापक बलजित सिंग, अपर्णा बसमन, मूल्यमापन तज्ज्ञ श्रीमंत फुकडा, पियानंदन यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला़
राहाता बाजार समितीत शेतकरी हिताचे व व्यापारी वर्गासाठी सुविधा देणाऱ्या उपक्रमांची पाहणी केली़ व्यवहाराची माहिती घेतली तसेच येथे सुरू असलेल्या आॅनलाईन बाजाराची पाहणी करून समाधान व्यक्त केले. शेतकरी, व्यापारी, आडते, यांच्याशी या शिष्टमंडळाने चर्चा केली़ ही बाजार समिती राबवत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले व याच धरतीवर आसाम राज्यात बाजार समित्या अद्ययावत केल्या जातील असे प्रतिपादन तपन डेका यांनी केले. बाजार समिती सचिव उध्दवराव देवकर यांनी प्रास्ताविक केले़ यावेळी बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
(वार्ताहर)