पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:25 IST2021-02-25T04:25:59+5:302021-02-25T04:25:59+5:30

कोपरगाव : घराचे कर्ज फेडण्यासाठी मोहरून पाच लाख रुपये आणावे, यासाठी विवाहतेचा तिच्या सासरी वैजापूर ( जि. औरंगाबाद ...

Marital harassment for five lakhs | पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

कोपरगाव : घराचे कर्ज फेडण्यासाठी मोहरून पाच लाख रुपये आणावे, यासाठी विवाहतेचा तिच्या सासरी वैजापूर ( जि. औरंगाबाद ) येथे २०१७ ते २०१९ या कालावधीत वारंवार शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करून उपाशी पोटी ठेऊन घराबाहेर काढून छळ केल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी माई सचिन जोर ( वय २२, रा. पाटील गल्ली, वैजापूर जि. औरंगाबाद, हल्ली रा. तळेगाव मळे ता. कोपरगाव ) यांच्या फिर्यादीवरून पती सचिन बाळनाथ जोरे, सासरा बाळनाथ निवृत्ती जोरे, सासू मुक्ताबाई बाळनाथ जोरे, दीर प्रवीण बाळनाथ जोरे, नणंद अर्चना अजय इंगळे, नंदई अजय नाना इंगळे ( सर्व रा. वैजापूर, जि. औरंगाबाद ) यांच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी ( दि.२३ ) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Marital harassment for five lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.