मराठी भाषा अमराठी भाषिकांपर्यंत न्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:41 IST2021-02-28T04:41:07+5:302021-02-28T04:41:07+5:30
अहमदनगर : जगाच्या पाठीवर जवळजवळ बारा कोटी लोक मराठी बोलतात. महाराष्ट्रात नव्हे, तर प्रत्येक राज्यात आणि विविध देशांमध्ये ...

मराठी भाषा अमराठी भाषिकांपर्यंत न्यावी
अहमदनगर : जगाच्या पाठीवर जवळजवळ बारा कोटी लोक मराठी बोलतात. महाराष्ट्रात नव्हे, तर प्रत्येक राज्यात आणि विविध देशांमध्ये मराठी माणूस पोहोचला आहे तेथे मराठी भाषा पोहोचली आहे. मात्र, आपली मातृभाषा अधिक समृद्ध करण्यासाठी अमराठी भाषिकांपर्यंत जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन निवड कॉमर्स न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर शाखेच्या वतीने शनिवारी मराठी भाषा दिन व कवी कुसुमाग्रज जयंती सावेडी येथील नर्सिंग कॉलेजमध्ये साजरी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचे अध्यक्ष अनिरुद्ध देवचक्के होते.
मेधा काळे म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून मराठी माणूस मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे. चंद्रकांत पालवे म्हणाले, आपल्या भाषेतील साहित्य हे अनुवादित होऊन इतर भाषांत व देशाच्या विविध भाषांत रूपांतरित झाली तर आपल्या भाषेची ताकद सर्वांच्या लक्षात येईल. अनिरुद्ध देवचक्के म्हणाले, महाराष्ट्र साहित्य परिषद नगर शाखा ही साहित्य संवर्धनाचे व मराठी भाषा व साहित्य रुजवण्याचे काम करीत आहे.
यावेळी कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे वाचन चंद्रकांत पालवे, कार्याध्यक्ष किशोर मरकड, प्रा. रवींद्र देवढे, प्रा. चंद्रकांत जोशी, रत्ना वाघमारे यांनी केले. कार्यकारिणी सदस्य व ज्येष्ठ कवी अरविंद ब्राह्मणे यांनी संकलित केलेल्या जुन्या म्हणी सादर करून रसिकांची दाद मिळविली. उपाध्यक्ष डॉ. शीतल मस्के यांनी स्वागत केले, तर प्रास्ताविक किशोर मरकड यांनी केले. खजिनदार दशरथ खोसे व प्रकल्पप्रमुख श्याम शिंदे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमात धमाका दिवाळी अंकास पारितोषिक मिळाल्याबद्दल संपादक नसीर शेख, केंद्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल कवी चंद्रकांत पालवे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाट्य कला सेलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्याम शिंदे, कार्यवाह चंद्रकांत जोशी यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल व महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक संघटनेच्या राज्य कार्यकारिणी कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल किशोर मरकड यांचा सत्कार करण्यात आला. मसापतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पारितोषिक मिळविणाऱ्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये प्रथम क्रमांक श्रद्धा वझे, द्वितीय क्रमांक अशोक सप्तर्षी, तृतीय क्रमांक शरद धलपे, वैशाली धर्माधिकारी, उत्तेजनार्थ रोहिणी बनकर, बलभीम शिंदे, दिलीप साळी, विशेष निबंध उषा सोलंकर, जयश्री खिस्ती यांना प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. निबंध स्पर्धेचे परीक्षण कार्यवाह प्राध्यापक चंद्रकांत जोशी यांनी केले.
मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी प्रमुख वक्ते प्राचार्य भास्करराव जावरे. समवेत अध्यक्ष अनिरुद्ध देवचक्के, कार्याध्यक्ष किशोर मरकड, चंद्रकांत पालवे, मेधा काळे, डॉक्टर शीतल मस्के, चंद्रकांत जोशी, नसीर शेख, दशरथ खोसे, अरविंद ब्राह्मणे व बक्षीसपात्र स्पर्धक दिसत आहेत.
---
फोटो २७ मसाप
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर शाखेतर्फे मराठी दिनानिमित्त शनिवारी झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. भास्कर झावरे, अनिरुद्ध देवचक्के, किशोर मरकड, चंद्रकांत पालवे आदी.