दादा पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:41 IST2021-02-28T04:41:42+5:302021-02-28T04:41:42+5:30
कर्जत : येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी विभागाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...

दादा पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
कर्जत : येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी विभागाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मला भावलेली कुसुमाग्रजांची कविता, या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे संकलन करून मराठी विभागाच्याच हस्तलिखितात कवितांचे संपादन करून मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले.
यावेळी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार राहुल जगताप, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पासाहेब धांडे, प्राचार्य डॉ. बाळ कांबळे, मराठी विभाग प्रमुख प्रा. भास्कर मोरे, प्रा. अनंत सोनवणे व महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात वक्तृत्व, निबंध, पत्रलेखन व कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचे वाचन इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी विभाग प्रमुख प्रा. भास्कर मोरे, प्रा. अनंत सोनवणे, मीना खेतमाळीस, प्रा. वृद्धेश्वर गरुड, प्रा. संगीता भोसले यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.