‘मराठा संघटनांनी मोर्चाचे श्रेय लाटू नये’
By Admin | Updated: October 7, 2016 01:25 IST2016-10-07T00:33:24+5:302016-10-07T01:25:30+5:30
अहमदनगर : अत्यंत शिस्तब्द पद्धतीने नगर शहरातून निघालेल्या मराठा मूक महामोर्चाला नेतृत्व नव्हते़ तरीही लाखोंच्या संखेने मोर्चा निघाला़ मराठा संघटनांचा

‘मराठा संघटनांनी मोर्चाचे श्रेय लाटू नये’
अहमदनगर : अत्यंत शिस्तब्द पद्धतीने नगर शहरातून निघालेल्या मराठा मूक महामोर्चाला नेतृत्व नव्हते़ तरीही लाखोंच्या संखेने मोर्चा निघाला़ मराठा संघटनांचा मोर्चात कोणताही सक्रिय सहभाग नव्हता आणि नाही, या संघटनांनी मोर्चाचे श्रेय लाटू नये, असे पत्रक सकल मराठा समाज संघटनेच्या कोअर कमिटीने प्रसिद्धीस दिले आहे.
कोअर कमिटीचे अध्यक्ष कैलास गिरवले, उपाध्यक्ष चंद्रकांत गाडे, सचिव बाळासाहेब पवार यांनी हे पत्रक काढले आहे. मराठा समाजाचा नगरचा मोर्चा रेकॉर्ड ब्रेक ठरला़
सुमारे २५ लाख मराठे मोर्चाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले़ मोर्चाचे आयोजन सकल मराठा समाजाने केले होते, असे नमूद करून शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर, तसेच मराठा समाजाच्या नावे काम करणाऱ्या मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय छावा संघटना आणि स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड यांचा सदर आयोजनात कोणताही सक्रिय सहभाग नव्हता आणि नाही़ त्यामुळे या संघटनांनी मोर्चा संदर्भात श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. यासंदर्भात मतप्रदर्शनही करु नये, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. मोर्चाचे श्रेय हे प्रत्येक बांधवाला आहे. समाजाचे श्रेय कोणी घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाची शुक्रवारी ११ वाजता नंदनवन लॉन येथे बैठकही आयोजित करण्यात आली आहे.
संजीव भोर यांच्या तडीपारीवरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भोर यांनी तडीपारीच्या प्रस्तावाचा मोर्चाशी संबंध जोडू नये, अशी भूमिका विविध संघटनांनी यापूर्वीच घेतली आहे. सकल मराठा समाजाने आता सर्वांनाच फटकारले आहे.