भांग विक्रेती महिला गजाआड
By Admin | Updated: August 8, 2014 00:08 IST2014-08-07T23:46:36+5:302014-08-08T00:08:09+5:30
अहमदनगर : भांग विक्री करणाऱ्या सरिता कांतीलाल शाहू ( रा.माजनपीर,ता. बुऱ्हाणपूर,मध्यप्रदेश) या महिलेला कोतवाली पोलिसांनी बुधवारी अटक केली.

भांग विक्रेती महिला गजाआड
अहमदनगर : भांग विक्री करणाऱ्या सरिता कांतीलाल शाहू ( रा.माजनपीर,ता. बुऱ्हाणपूर,मध्यप्रदेश) या महिलेला कोतवाली पोलिसांनी बुधवारी अटक केली. या महिलेकडून पोलिसांनी २१ किलो भांग जप्त करण्यात आली आहे.
भांग विक्रीस येत असल्याची कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार केडगाव,भूषणनगर भागात सकाळी सापळा लावण्यात आला. यावेळी रिक्षामध्ये भांग घेऊन जाणारी महिला आढळून आली. तिच्याकडे झडती घेतली असता २१ किलो भांग आढळून आली. सदर महिलेने कोठून भांग आणली होती, कुठे चालली होती, याची पोलीस चौकशी करीत आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वाय.डी. पाटील, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली. सदर भांग ही दहा हजार रुपये किमतीची असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर महिलेविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिलेला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर महिलेची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
(प्रतिनिधी)