वांग्याच्या भावाचे भरीत
By Admin | Updated: September 28, 2016 00:36 IST2016-09-28T00:05:44+5:302016-09-28T00:36:49+5:30
भाऊसाहेब येवले , राहुरी कांद्याला पाच पैसे किलो भाव मिळल्याचा प्रकार नुकताच घडला़ त्यापेक्षाही वाईट वेळ वांगे उत्पादकांवर आली आहे़ सर्व खर्च वजा जाता वांगे विक्री केल्यानंतर

वांग्याच्या भावाचे भरीत
भाऊसाहेब येवले , राहुरी
कांद्याला पाच पैसे किलो भाव मिळल्याचा प्रकार नुकताच घडला़ त्यापेक्षाही वाईट वेळ वांगे उत्पादकांवर आली आहे़ सर्व खर्च वजा जाता वांगे विक्री केल्यानंतर शेतकऱ्याला व्यापाऱ्यालाच पैसे देण्याची वेळ ओढवली. मांजरी (ता़ राहुरी) येथील शेतकऱ्याला उणे दहा पैसे भाव मिळाला आहे़ त्यामुळे वांग्याच्या भावाचे चक्क भरीत झाले आहे.
मांजरी येथील शेतकरी अंबादास विटनोर यांनी मुंबई येथे पाच पोते वांगे पाठविले होते़ वांग्याला चांगला भाव मिळेल, अशी आशा होती़ मात्र खर्च तर सोडाच उलट किलोमागे दहा पैसे द्यावे लागले़ त्यामुळे वांगे तोडणी बंद करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे़
अंबादास विटनोर यांनी पाच पोत्यामध्ये २४२ किलो वांगे मुंबईला पाठविले होते. १ हजार २१० रूपये वांग्याची पट्टी आली़ मोटार भाडे ६५० रूपये खर्च आला़
तोलाई २० रूपये आकारण्यात आली़ ५० रूपयांचे पोते तर २५ रूपयांची कॅ री बॅग घेतली़ वांगी तोडणीवर ४५० रूपये मजुरी खर्च झाला़ त्यामुळे विटनोर यांना फ ायद्याऐवजी उणे १० पैसे किलोमागे तोटा आला़
अंबादास विटनोर यांनी सव्वा एकर वांग्याची पूर्वमशागत करून खत टाक ले़ रोप, मशागत, खुरपणी, नांगरट, औषध फवारणी यावर खर्च केला़ त्यामुळे वांग्याचे पीक चांगले आले़ मात्र भाव कोसळल्याने वांगे तोडणे देखील परवडेनासे झाले आहे़