मांडवा शाळेची भिंत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 13:11 IST2017-07-21T13:11:48+5:302017-07-21T13:11:48+5:30
जिल्हा परिषदेच्या मांडवे (ता. नगर) येथील शाळेच्या वर्गाची भिंत पावसामुळे कोसळली.

मांडवा शाळेची भिंत कोसळली
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या मांडवे (ता. नगर) येथील शाळेच्या वर्गाची भिंत पावसामुळे कोसळली. शाळेची इमारत जुनी असल्याने अन्य वर्गही धोकादायक अवस्थेत आहेत. जिल्हा परिषदेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शाळेतील मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
मांडवे जिल्हा परिषदेच्या शाळेतील सहा वर्गांचे बांधकाम स्वातंत्र्यपूर्व काळात झालेले आहे. केवळ दगड-मातीच्या असलेल्या या बांधकामाने अनेक दशके तग धरला. परंतु सध्या हे सर्वच वर्ग खिळखिळे झाले आहेत. अनेक भिंतींना तडे गेले आहेत. अशाच एका वर्गाच्या भिंतीला पावसामुळे खिंडार पडले. शिवाय उरलेली भिंतही कधी पडेल याचा भरवसा नाही. त्यामुळे हा वर्ग मुलांना बसण्यास बंद झाला आहे. इमारतीवरील सर्व पत्रेही खराब झाले आहेत. त्यामुळे पावसात शाळा गळते.
मांडवे शाळेत शंभर-दीडशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या धोकादायक वर्गांमुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेने तत्काळ दखल घेऊन या वर्गांचे पुनर्बांधकाम करून द्यावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.