पंचायत समितीविरूद्ध मनेसेचे आंदोलन
By Admin | Updated: September 3, 2014 23:58 IST2014-09-03T23:32:12+5:302014-09-03T23:58:04+5:30
श्रीरामपूर : उंदीरगावमध्ये डेंग्यूने एका बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मनसेच्या वतीने श्रीरामपूर पंचायत समिती आवारात धरणे आंदोलन करण्यात आले.

पंचायत समितीविरूद्ध मनेसेचे आंदोलन
श्रीरामपूर : उंदीरगावमध्ये डेंग्यूने एका बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मनसेच्या वतीने श्रीरामपूर पंचायत समिती आवारात धरणे आंदोलन करण्यात आले. आरोग्य विभागाने मात्र डेंग्यूचा इन्कार केला.
मनसेचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, शहराध्यक्ष तिलक डुंगरवाल, डॉ. संजय नवथर, अॅड. रमेश कोळेकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष योगिता लोखंडे, उपतालुकाध्यक्ष विलास भालेराव, शहर सचिव विकास डेंगळे, विजय बोर्डे, उपतालुकाध्यक्ष लखन लोखंडे, मुजीब शेख, सुरेश कनगरे, अप्पा मुठे, संतोष आवटी, विशाल थोरात, राहूल लिहिणार, सोमनाथ धनगर, निलेश सोनवणे, अविनाश भोसले, ग्रामपंचायत सदस्य संजय दरंदले आदींनी बुधवारी आंदोलन केले. गटविकास अधिकारी परीक्षित यादव यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करण्याचे, तसेच दोन दिवसांत तालुकाभर स्वच्छता मोहीम राबविण्याचे आश्वासन दिले.
(प्रतिनिधी)
उंदीरगावातील मृत झालेल्या ५ महिन्यांच्या बालिकेच्या घरी जाऊन आलो. तिला १६ आॅगस्टला ताप आला होता. नंतर श्रीरामपूरच्या दोन खाजगी रूग्णालयात उपचार करून तिला नगरला उपचारासाठी नेले होते. तेथेच तिचा मृत्यू झाला. तिच्या रक्त तपासण्या केल्याची कागदपत्रे मिळाली नाहीत. मनसेचे डॉ. सचिव नवथर यांच्या घरावरच डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या एडीस एजिप्ती डासांच्या अळ्या दिसल्या. त्या त्यांनाही निदर्शनास आणून दिल्या. त्यांच्या मुलीच्या प्लेटलेटस् प्रमाणात आहेत. डेंग्यू निगेटीव्ह आहे. डॉक्टरांनी तिला डेंग्यू सांगितल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.संबंधित डॉक्टरांची उद्या भेट घेणार आहे. तालुक्यात सध्या तरी डेंग्यू नाही. - डॉ. सुभाष गल्हे,
तालुका आरोग्याधिकारी, श्रीरामपूर