अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील व्यवस्थापकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 18:26 IST2021-07-27T18:24:15+5:302021-07-27T18:26:10+5:30

अहमदनगर:आर्थिक गैरव्यवहारामुळे चर्चेत असलेल्या नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय ५८रा. भातकुडगाव ता. शेवगाव) यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली.

Manager of Urban Bank's Shevgaon branch commits suicide | अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील व्यवस्थापकाची आत्महत्या

अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील व्यवस्थापकाची आत्महत्या

अहमदनगर:आर्थिक गैरव्यवहारामुळे चर्चेत असलेल्या नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय ५८रा. भातकुडगाव ता. शेवगाव) यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली.

याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिंदे हे मंगळवारी दुपारी भातकुडगाव येथील त्यांच्या शेतात बेशुद्ध अवस्थेत कुटुंबियांना आढळून आले. त्यांना तत्काळ शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मयत शिंदे यांचे चुलत भाऊ कचरू शिंदे यांनी याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान शिंदे यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याची चर्चा आहे. याला मात्र पोलिसांनी दुजोरा दिला नाही.

अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील सोनेतारण अपहार नुकताच चव्हाट्यावर आला आहे. कर्जदारांनी बँकेत गहाण ठेवलेले सोने संशयास्पद असून त्याची चाैकशी करावी असे पत्र गोरक्षनााथ शिंदे यांनी २०१८ मध्ये बँकेचे संचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते. या पत्रावर मात्र काहीच कार्यवाही झाली नाही. याच तणावातून शिंदे यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

Web Title: Manager of Urban Bank's Shevgaon branch commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.