स्वस्तात सोन्याच्या आामिषातून पुण्यातील व्यक्तीला दहा लाखांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:21 IST2021-04-10T04:21:22+5:302021-04-10T04:21:22+5:30

जामखेड : पुणे शहरातील हडपसर येथील व्यक्तीला स्वस्तात सोने देण्याचे बहाण्याने जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे बोलावून १५ ते २० ...

A man from Pune was robbed of tens of millions by the lure of cheap gold | स्वस्तात सोन्याच्या आामिषातून पुण्यातील व्यक्तीला दहा लाखांना लुटले

स्वस्तात सोन्याच्या आामिषातून पुण्यातील व्यक्तीला दहा लाखांना लुटले

जामखेड : पुणे शहरातील हडपसर येथील व्यक्तीला स्वस्तात सोने देण्याचे बहाण्याने जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे बोलावून १५ ते २० जणांच्या टोळीने दहा लाख सात हजार रुपये रोख, मोबाईल, असे एकूण १० लाख १४ हजार रुपयांना लुटले. याबाबत मोसीन अब्दुल जब्बार (वय ३३, रा. हडपसर, पुणे) यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे शहरातील हडपसर येथील मोसीन जब्बार यांना अमोल काळे (पूर्ण नाव माहीत नाही), रामा (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी स्वस्तात सोने देऊ असे सांगितले. त्या व्यक्तीचा विश्वास संपादन केला. यानंतर आरोपींनी तालुक्यातील पाटोदा (गरडाचे) या परिसरात ३१ मार्च रोजी सकाळी सातच्या सुमारास जब्बार यांना बोलाविले. त्यावेळी तेथे १५ ते २० जण दबा धरून बसले होते. अमोल काळे व रामा याने इशारा करताच दबा धरून बसलेल्यांनी जब्बार यांच्या हातातील १० लाख रुपये, सात हजार रुपयांचे दोन मोबाईल कोयता व तलवारीचा धाक दाखवून लुटून नेले. याबाबत त्या व्यक्तीने गुरुवारी (दि.८ एप्रिल) जामखेड पोलिसात फिर्याद दिली. यावरून १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर करीत आहेत.

Web Title: A man from Pune was robbed of tens of millions by the lure of cheap gold