माणसातील माणूसपण हरवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST2020-12-15T04:36:37+5:302020-12-15T04:36:37+5:30
राष्ट्र सेवा दल, अगस्ति एज्युकेशन सोसायटी, शिक्षक भारती, हिंदी अध्यापक सभा व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने साथी बाळासाहेब ...

माणसातील माणूसपण हरवले
राष्ट्र सेवा दल, अगस्ति एज्युकेशन सोसायटी, शिक्षक भारती, हिंदी अध्यापक सभा व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने साथी बाळासाहेब शेळके, साथी नारायणराव एखंडे व अगस्ती विद्यालायचे विद्यार्थी प्रिय शिक्षक संपतराव वाळुंज यांचे निधनानिमित्त येथील सर्वोदय छात्र निवास येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आपल्या सावंत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. त्यांनी राष्ट्र सेवा दलातील जुन्या आठवणींना उजाळा देत शेळके साहेब, एखंडे साहेब यांच्या योगदानाबद्दल सांगत तरुण पिढीला असे समर्पित भावनेने काम करण्याची गरज आहे, असे सांगितले. संपतराव वाळुंज यांच्या अकाली जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली असून सेवा दलाचे हे तीन खंदे कार्यकर्ते आपण गमावले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी सतीश नाईकवाडी, विनय सावंत, वसंत मनकर, प्रा महेश पाडेकर, शिवाजी नाईकवाडी, पुरुषोत्तम पगारे, उमेश डोंगरे, दीपक पाचपुते यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी शिरीष नाईकवाडी, संपत नाईकवाडी, डी.के. वैद्य, शांताराम गजे, संजय शिंदे, लक्ष्मण आव्हाड, प्राचार्य जी.पी.अभंग यांच्यासह सेवादलाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप तुळशीराम जाधव यांनी पसायदानाने केला. सूत्रसंचालन सतीश पाचपुते यांनी केले. दिवंगतांच्या आठवणी चिरकाळ स्मरणात रहाव्यात म्हणून वृक्षारोपण करण्यात आले.