कोतूळ जवळ दोन भाच्यांसह मामाचा नदीत बुडून मृत्य्यू,मामा शिक्षक तर दोन भाचे आयटी इंजिनियर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 20:50 IST2020-04-12T20:49:59+5:302020-04-12T20:50:09+5:30
कोतूळ (ता. अकोले) : कोतूळ जवळील चास (पिंपळदरी) गावालगत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन जणांचा बुडून मृत्यू झाला तर तीन जणांना एकाने वाचवले. चास (पिंपळदरी) शिवारात मुळा नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात चास व पिंपळदरी येथील एकाच कुटुंबातील सहा -सात लोक पोहण्यासाठी गेले. पैकी सुनील तुकाराम वाडेकर (रा. चास वय ४५), सचिन दत्तात्रय फापाळे (३५), प्रविण दत्तात्रय (३०, पिंपळदरी) दुपारी चार वाजता बुडून मृत्यू पावले.

कोतूळ जवळ दोन भाच्यांसह मामाचा नदीत बुडून मृत्य्यू,मामा शिक्षक तर दोन भाचे आयटी इंजिनियर
कोतूळ (ता. अकोले) : कोतूळ जवळील चास (पिंपळदरी) गावालगत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन जणांचा बुडून मृत्यू झाला तर तीन जणांना एकाने वाचवले.
चास (पिंपळदरी) शिवारात मुळा नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात चास व पिंपळदरी येथील एकाच कुटुंबातील सहा -सात लोक पोहण्यासाठी गेले. पैकी सुनील तुकाराम वाडेकर (रा. चास वय ४५), सचिन दत्तात्रय फापाळे (३५), प्रविण दत्तात्रय (३०, पिंपळदरी) दुपारी चार वाजता बुडून मृत्यू पावले.
दरम्यान पाचसहा एकाच घरातील नातेवाईक पोहत असताना एक जण बुडू लागल्याने आरडा ओरडा झाला असता नदिकडेला असलेल्या भाऊराव बर्डे या तरूणाने जीव धोक्यात घालून तीघांना बाहेर काढले.मात्र सुनिल वाडेकर (मामा) हे शिक्षक होते. व सचिन व प्रविण (भाचे ) हे सख्खे भाऊ अनुक्रमे पुणे व मुंबई येथे आयटी क्षेत्रात इंजिनियर होते. या घटनेने चास पिंपळदरी गावात शोककळा पसरली आहे. अकोले पोलीस निरीक्षक निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली
सुनिल वाडेकर हे पोहणारे म्हणून प्रसिध्द होते.मात्र बुडणाºया दोन्ही भाच्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मामाला मिठी मारल्याने तिघाही जणांना जलसमाधी मिळाली.