माळवाडगाव आरोग्य केंद्राला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST2021-06-11T04:14:34+5:302021-06-11T04:14:34+5:30

श्रीरामपूर : माळवाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा जि.प. सदस्या संगीता गांगुर्डे व सरपंच ...

To Malwadgaon Health Center | माळवाडगाव आरोग्य केंद्राला

माळवाडगाव आरोग्य केंद्राला

श्रीरामपूर : माळवाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा जि.प. सदस्या संगीता गांगुर्डे व सरपंच बाबासाहेब चिडे यांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्हा परिषदेकडे दोन वर्षे केलेल्या पाठपुराव्याला यश आले. त्याबद्दल सरपंच चिडे यांनी जिल्हा परिषद सदस्या मंगल पवार व संगीता गांगुर्डे यांचे आभार मानले. माळवाडगाव अंतर्गत येणाऱ्या गावातील रुग्णांना पुढील उपचाराकरिता इतरत्र हलविण्यासाठी समस्या येत होती. आता ती अडचण दूर होणार आहे, असे सरपंच चिडे यावेळी म्हणाले.

आरोग्य अधिकारी डॉ.सोहेल शेख, दत्तात्रय नागुडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष गिरीधर आसने, ग्रामसेवक विजयकुमार मेहत्रे,डॉ. कैलास सैंदोरे, किसन आसने, माजी सरपंच शेषराव खाजेकर, रावसाहेब काळे, विश्वास वाघमारे, दिलीप हुरुळे, जालिंदर आसने, जयदीप आसने, बबन आसने, अमोल मोरे, दत्तात्रय दळे आदी उपस्थित होते. आभार नानासाहेब आसने यांनी मानले.

---------

Web Title: To Malwadgaon Health Center